मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे प्रथमच आयोजन : तीन दिवसीय सोहळ्याची ‘मंगलमय’ वातावरणाने सांगता

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260913-WA0475

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे प्रथमच आयोजन : तीन दिवसीय सोहळ्याची ‘मंगलमय’ वातावरणाने सांगता

 

अमळनेर : विक्की जाधव.

येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेल्या श्री मंगळग्रह देवांच्या परम पवित्र तीन दिवसीय भव्य महारुद्र पूजेची आज शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास भक्ती, चैतन्य आणि मंगलमय वातावरणात पूर्णाहुतीने सांगता झाली.

यावेळी आमदार अनिलदादा पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सौ. जयश्रीताई पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व सहाय्यक निरीक्षक शरद काकळीज यांच्यासह आणि समाजातील विविध पक्ष, संस्था, संघटना, समाजांचे अनेक पदाधिकारी, सदस्य, विविध महिला मंडळांच्या पदाधिकारी, सदस्या यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते. प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती श्री. केशव पुराणिक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृद्धी तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त हा भव्य महारुद्र अभिषेक पूजा सोहळा आयोजित करण्यात आला.

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाताई महाले या विशेष धार्मिक सोहळ्याचे यजमान होते. त्यांच्या शुभहस्ते या तीन दिवसीय परम पवित्र भव्य महारुद्र अभिषेक पूजेचे अनुष्ठान कार्य झाले. आज शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी या भव्य महारुद्र अभिषेक पूजेच्या पूर्णाहुतीपूर्वी सकाळी साडेनऊच्या सुमारास सर्व स्थापित देवतांची पूजा झाली. ‘अष्टोत्तरशत लिंगतो भद्र मंडलावर’ भगवान महादेवांची व श्री मंगळग्रह देव, भूमिमाता, पंचमुखी हनुमानजी यांनाही आवाहन करत त्यांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर अरणीमंथन करून अग्नी प्रज्वलित करण्यात आला. नवग्रह रुद्र स्थापन करून त्यांचे हवन झाले. प्रधान देवता श्री मंगळग्रह देव व भगवान महादेव वांच्याप्रीत्यर्थ रुद्राच्या १२१ आवर्तनांनी हवन (अंदाजे २००० आहुत्या) यज्ञात टाकण्यात आल्या. भगवान शंकरांच्या जल्लोषपूर्ण तांडवस्तोत्राने पूर्णाहुतीसाठीची वातावरणनिर्मिती झाली. त्यानंतर विशेष हवन, बलिदान व पूर्णाहुती झाली. पूर्णाहुतीनंतर महाआरती, मंत्रपुष्पांजली झाली. त्यानंतर पुरोहितांनी फडकत्याचालीवर शिवशंकरांचे संगीताच्या साथीने भक्तीगित म्हटले. त्यावर डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सी. आशाताई महाले, आमदार अनिलदादा पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सौ. जयश्रीताई पाटील यांच्यासह उपस्थित भाविकांनी नृत्याचा आनंद घेतला. भक्तीमय, चैतन्यमय आणि मंगलमय वातावरणात अतिशय जल्लोषपूर्ण या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. सदर तीन दिवसीय परम पवित्र महारुद्र अभिषेक पूजेसाठी वेदमूर्ती व्यंकटेश कळवे गुरुजी, सारंग पाठक, शुभम वैष्णव, प्रसाद भंडारी, परशुराम शर्मा, पवन शर्मा, यश जोशी, चंद्रकांत जोशी, तुषार दीक्षित, जयंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, विनोद पाठक, दिव्येश जोशी, शैलेश जोशी, उमेश पंचभाई, निलेश रोडे, हेमंत गोसावी यांच्यासह अयोध्या व प्रयागराज येथून खास निमंत्रित गौरव मिश्रा, सूरज मिश्रा, मनजीत मिश्रा व हरिओम शुक्ल यांनी पौरोहित्य केले. त्यांना उमेश पाठक, प्रवीण भंडारी व चेतन नाईक यांच्यासह मंदिरातील सेवेकऱ्यांनी सहकार्य केले. मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे यांच्यासह मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, व्ही. व्ही. कुलकर्णी, उमाकांत हिरे, बाळा पचार, पुषंद ढाके आदींनी परिश्रम घेतले

 

आमदार अनिलदादांकडून टाळ वादन सेवा

श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित तीन दिवसीय परम पवित्र महारुद्र अभिषेक पूजेच्या पूर्णाहुतीपूर्वी दुपारी आमदार अनिलदादा पाटील ‘अष्टोत्तरशत लिंगतो भद्र मंडल स्थानी काही वेळ बसले. यावेळी वाद्यवृंदाच्या साथीत म्हटल्या गेलेल्या श्री मंगळग्रह देव आणि भगवान शंकर यांच्या स्तुतीपर भजनांवर टाळ वादन करीत मंत्रमुग्ध होऊन साथसंगत केली. याप्रसंगी उपस्थित असंख्य भाविकांनीही या स्तुतीपर भजनांचा आत्मानंद घेतला.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!