फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांच्या रोल-प्लेने जिंकली मने

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260908-WA0610

फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांच्या रोल-प्लेने जिंकली मने

 

अमळनेर :विक्की जाधव.

खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी आणि स्व.प्रा.र.का.केले. कॉलेज ऑफ बी.फार्मसी महाविद्यालयात ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका (रोल-प्ले) साकारून संपूर्ण दिवसाचे कामकाज अत्यंत यशस्वीपणे सांभाळले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन समन्वयक प्रा.डाॅ.एम.एस.वाघ व प्र.प्राचार्य प्रा. प्रितम पाटील यांनी केले यानंतर अंतिम वर्षाचा विद्यार्थी तन्मय राकेश पाटील याने प्राचार्य पदाची सूत्रे हाती घेत उत्कृष्ट नियोजन केले. तर गीता पाटील, मयुरी पाटील, प्रियंका सैंदाणे, तन्मय पाटील, श्वेता पाटील, श्रावणी महाजन, शीतल पाटील, साक्षी पाटील आणि उदय पाटील या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांची भूमिका साकारून वर्ग नियंत्रणासोबतच तासिकेचे कामकाज पाहिले.

द्वितीय वर्ष बी. फार्मच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून शिक्षकांप्रति आदर व कृतज्ञता व्यक्त केली. यामध्ये अदिती गोहोर, भाग्यश्री मंडोले, चैताली बोरसे, लक्ष्मी महाजन आणि मोहन पाटील यांनी शिक्षकांचे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्व यावर प्रभावी विचार मांडले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्षाच्या साक्षी पाटील, गीता पाटील, प्रियंका सैंदाणे आणि रोशनी महाजन यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले. शेवटी डिप्लोमा अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कल्याणी पाटील हिने उपस्थितांचे आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!