निंबोडी ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम; स्मशानभूमी परिसरात १०० देशी झाडांची लागवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-25 at 2.32.47 PM

निंबोडी ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम; स्मशानभूमी परिसरात १०० देशी झाडांची लागवड

(निलेश गायकवाड)

बारामती (प्रतिनिधी) – निसर्ग संवर्धनाचा केवळ नारा न देता प्रत्यक्ष कृतीतून आदर्श निर्माण करण्याचे काम निंबोडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीने केले आहे.

आज दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सरपंच संतोष सोनवणे यांच्या पुढाकाराने गावातील स्मशानभूमी रोड, स्मशानभूमी परिसर आणि गावठाण परिसरात १०० देशी झाडांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन बारामती ॲग्रोचे चेअरमन राजू दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच संतोष सोनवणे म्हणाले, “गावात जेथे जेथे मोकळी व पडीक जागा आहे, तेथे माळरानावर झाडे लावून खऱ्या अर्थाने निसर्गाचे संगोपन करण्याचा आमचा मानस आहे.”

या उपक्रमात केवळ शोभेची झाडे न लावता वड, पिंपळ, चिंच, करंज, आवळा, सीताफळ यांसारख्या देशी आणि दीर्घायुषी वृक्षांना प्राधान्य देण्यात आले आहे. केवळ वृक्षारोपण न करता ते जगवण्यावर ग्रामपंचायतीने भर दिला असून प्रत्येक रोपासाठी २ बाय २ चा खड्डा घेऊन शास्त्रीय पद्धतीने लागवड करण्यात आली आहे. या झाडांच्या संगोपनासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करून देखभालीची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीने घेतली आहे.

राजू पवार यांच्याकडून विकासकामांना मदत जाहीर –

दरम्यान, कार्यक्रमासाठी आलेले बारामती ॲग्रोचे चेअरमन राजू दादा पवार यांनी गावाची पाहणी केली असता गावातील पिण्याच्या पाण्याचे दोन फिल्टर बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ दोन्ही फिल्टर बारामती ॲग्रोकडून दुरुस्त करून सुरू करण्याचे आदेश दिले.

तसेच छत्रपती हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा निंबोडी आणि आरोग्य उपकेंद्र निंबोडी या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी मार्च महिन्यात निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे आणि सरपंच, पदाधिकारी व सदस्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमास सरपंच संतोष सोनवणे, उपसरपंच नामदेव बाड, माऊली बाड, पद्माकर गलांडे, संजय धुमाळ, भीमराव पवार, धनंजय धुमाळ, सलीम मुलाणी, मंगेश खंडागळे, गणेश खंडागळे, विष्णू देवकाते, तुषार शिरसागर, दीपक ठोंबरे, केदार खडके, निलेश धायतोंडे, अनिल जगताप, ग्रामविस्तार अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!