कारला दुचाकीचा धक्का लागल्याने नुकसान भरपाई मागणार्‍या कुटुंबावर प्राणघातक हल्ला.

अपनी भाषा में पढ़े! Translate

कारला दुचाकीचा धक्का लागल्याने नुकसान भरपाई मागणार्‍या कुटुंबावर प्राणघातक हल्ला.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – शहरातील महालक्ष्मी हॉस्पिटल परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका
कारला दुचाकीचा धक्का लागल्याने कार चालकाने झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी केल्यामुळे झालेल्या वादात कार चालकासह त्याच्या नातेवाइकांवर कोयता, लोखंडी रॉड व हॉकी स्टिकने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणात दौंड पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून, मंथन व स्वानंद नानासाहेब गोरे हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी यश नवनाथ गायकवाड (वय २०, रा. कासुर्डी, ता. दौंड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अश्पाक अन्सार सय्यद, कृष्णा भूपेंद्र भूल, अमोल ज्ञानेश्वर मुळे, झहीर नजीर सय्यद, सज्जस शौकत सय्यद आणि तबरेज शौकत सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांच्या ताब्यातील कारला संशयितांच्या दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे कारच्या नुकसानीची भरपाई मागितली. त्यावरून वाद झाल्यानंतर फिर्यादी, त्यांची आई, आजी, मावस भाऊ मंथन आणि स्वानंद यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक अमोल गवळी करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!