माफ करा दिघे साहेब, तुमच्या बाटलेल्या
आश्रमात मी येऊ शकत नाही !
आज आमचे सर्वांचे लाडके व आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची 25 वी पुण्यतिथी. आजच्याच काळरात्री 25 वर्षांपूर्वी दिघे साहेब आपल्याला सोडून गेले.
शिवसेनेतील एक आदर्श व ऋषितुल्य व्यक्तिमत्व पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी अद्याप भरून निघालेली नाही. दाढी वाढवून आनंद दिघे भासविण्याचे प्रयत्न अनेकजण करतात.
दिघेसाहेबांची निष्ठा, त्यांची त्यागी वृत्ती, त्यांच्या इतका आदर, मानसन्मान कोणाला मिळाला नाही व भविष्यात मिळणार नाही.
दिघेसाहेबांचा कट्टर शिष्य म्हणून स्वतः वर अभिषेक करुन घेणारे दिघेसाहेबांची शिवसेनेवरील निष्ठा, त्यागी वृत्ती, राजकीय लाभांच्या पदापासून अलिप्त राहणे, आबाल वृद्धांवर निरपेक्ष प्रेम करणे, या बाबतीत दिघे साहेबांच्या जवळपास कोणीही फिरकू शकत नाही. आजही दिघे साहेबांचे नाव घेतल्या शिवाय हे लोक निवडणूक लढवू शकत नाहीत, यातच तुमचे महत्व अधोरेखित होते.
दिघे साहेबांनी मनात आणले असते तर, आमदार, खासदार वा मंत्रिही झाले असते. परंतू त्यांना या पदांचा मोह कधीच शिवला नाही. किंग होण्यापेक्षा किंगमेकर होण्यातच त्यांनी धन्यता मानली. अनेक दिग्गज नेते ठाण्यात आले आणि आनंद आश्रमात दिघे साहेबांची भेट घेतली नाही असे
कधी होत नसे. आमदार, खासदार, मंत्र्याच्या दरबारात कधी गर्दी होत नसेल इतकी गर्दी त्यांच्या आनंद आश्रमात अहोरात्र होत असे. त्यांच्या दरबारातील पाणके , हरकामे, चालक हे आमदार, खासदार व मंत्री मुख्यमंत्री ही झाले तरी ते दिघेसाहेबांची उंची गाठू शकले नाहीत. कारण सत्ता, संपत्ती व प्रसिद्धीलोलूपता. दिघे साहेबांची जरब, दरारा इतका प्रभावी होता की मोठया मोठ्या भाईच्या चड्या पिवळ्या होत असत. त्यांच्या नजरेचे बाण समोरच्या अपप्रवृत्तीस घायाळ करीत. त्यांनी अमक्याला कानफाडले, तमक्याला कानफडले असा नाटकी प्रचार केला जात आहे. मात्र माझ्या माहिती प्रमाणे दोन लोकांवरच त्यांनी हात उचलला होता. बाकी त्यांची नजरच पुरेशी होती. दिगंगे साहेब पित्याचा धाक दाखवीत त्याच वेळी पुत्रवत प्रेम ही करीत. शिव सैनिकांच्या सुखा दुःखात धावब जात. माझ्यावर हल्ला झाल्या नंतर ते लगेच धावून आले असते, आजचा राजकीय पुढाऱ्या सारखे मौन धरण करण्या इतकी असंवेदनशीलता त्यांच्यात नव्हती. म्हणूनच लोक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकीत. माझ्या स्पष्टवक्तेपणावर ते क्षणिक रागवत पाण तितकाच अभिमानही बाळगत.
दिघे साहेबांचे वारसदार, अनुयायी म्हणवणारे खासदारकीत पडले, आमदारकीत पडले, नगरसेवक पद ही गेले तरी त्यांचा सत्तेचा मोह सुटत नाही. पक्ष फोडून भाजपाला उरावर बसवून आमचीच खरी शिवसेना म्हणणारे, शाखा ताब्यात घेणारे, ed, cbi, it ची रेड टाकण्याची धमकी देऊन संख्याबळ वाढवून शिवसेनेवर दावा करणारे, दिघे साहेबांचे अनुयायी म्हणवत आहेत. आनंद आश्रमाचे साधेपणा घालवून कॉर्पोरेट कार्यालयात बदलून त्यांचे अस्तित्व मिटवणारे आज आनंद ऑफिस मध्ये श्रद्धांजली वाहतील तेंव्हा दिघेसाहेब म्हणतील -हेच फळं काय मम तपाला? कुठे गेली ती गोर गरीब जनता जी न्यायाच्या अपेक्षेने यायची ? आज आनंद आश्रमात आयरामांसाठी रेड कार्पेट अंथरले जाते, जिथे गद्दारांना क्षमा नाही ही गर्जना गुंजायची तिथे गद्दारांच्या स्वागतासाठी कमानी उभारल्या जात आहेत, जिथे BJP ला आव्हान द्यायच्या योजना आखल्या जात असत तिथे, BJP चे चरणदास होण्यात धन्यता मानली जात आहे आनंद आश्रम आत्ता ठेकेदार, दलाल, सत्तापिपासू यांचे आश्रयस्थान झाले आहे.
*माफ करा साहेब, मी ह्या बाटलेल्या कॉर्पोरेट कार्यालयास आनंद आश्रम म्हणू शकत नाही.
तुमच्या तत्वावर चाललो आहे, चालत राहणार, हीच माझी आदरांजली मानावी.
आपल्या स्मृती जतन करुन त्याचे योग्य स्मारक झाल्यावर मी नक्कीच तिथे नतमस्तक व्हायला येईन*.
दिलीप मालवणकर
आपला लाडका शिवसैनिक
9822902470