सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील युवा नेतृत्व; इंजि. आकाश भाऊ माळी यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260601-WA0720

सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील युवा नेतृत्व; इंजि. आकाश भाऊ माळी यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

अमळनेर : आपल्या कर्तृत्व, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर अल्पावधीतच समाजात वेगळी ओळख निर्माण करणारे इंजि. आकाश भाऊ माळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व मित्रपरिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून उच्च शिक्षण घेत स्वतःच्या मेहनतीच्या बळावर यशाची गगनभरारी घेणाऱ्या आकाश भाऊंनी युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

अत्यंत कमी वयात नेतृत्वाची धुरा सांभाळत त्यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया प्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तसेच महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या अमळनेर तालुका युवक अध्यक्षपदाची धुरा सांभाळून समाजकार्याला नवी दिशा दिली. फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा वारसा जपत त्यांनी सलग तीन वर्षे फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या अमळनेर शहराध्यक्षपदावर काम केले असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

सामाजिक बांधिलकी जपणारे आकाश भाऊ दरवर्षी गौशाळेत चारा दान करून सेवाभाव जिवंत ठेवतात. मनमिळाऊ स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि समाजहितासाठी सातत्याने झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या १७ वर्षांपासून जय जिजाऊ मित्र परिवाराचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहून त्यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताचे उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर मित्र परिवाराने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!