अमळनेरमध्ये भव्य हिंदू संमेलन; एकता, समरसता आणि राष्ट्रभक्तीचा उत्सव.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरमध्ये भव्य हिंदू संमेलन; एकता, समरसता आणि राष्ट्रभक्तीचा उत्सव.

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य हिंदू संमेलनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे. हिंदू समाजामध्ये एकता, सामाजिक समरसता आणि बंधुभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जात, भाषा आणि प्रांतभेद विसरून सर्व हिंदूंनी एकत्र यावे आणि समाजातील एकात्मता अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

हिंदू समाजात राष्ट्रभक्तीची भावना अधिक बळकट करण्यासाठी आणि सामाजिक समरसतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे संमेलन महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही आयोजकांनी नमूद केले. “आता तरी हिंदूंनी जागे झाले पाहिजे,” असा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार असून समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या संमेलनाला अनेक संत-महंतांची पवित्र उपस्थिती लाभणार आहे. प.पू. श्री श्री 1008 महंत ईश्वरदासजी महाराज (संस्थापक श्री राम मंदिर संस्थान, नंदगाव) तसेच गुरुवर्य बालकनाथजी (श्री चैतन्य नवनाथ सिद्ध आश्रम संस्थान, नवनाथ नगरी, कोळपिंप्री) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मा. बापूसो प्रा. रमेश नथू महाजन, ज्येष्ठ कार्यकर्ते – सामाजिक समरसता मंच उपस्थितांना संबोधित करणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत सावता माळी वस्ती, श्री संत सखाराम महाराज नगर, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ४ वाजता प्रयागगिरी बाबा मठ येथून भव्य शोभायात्रेने होणार असून, त्यानंतर संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत श्रीकृष्ण मंदिर चौक, माळीवाडा येथे हिंदू संमेलन पार पडणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!