करमाळा पालिकेचा मास्टर प्लॅन – टाऊन हॉल निष्कासित होणार, ३८ विकासकामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा नगरपालिकेचा टाऊन हॉल व मुला- मुलींची शाळा नंबर चार समोरील वर्ग खोल्या निष्कासित करणे, दहिगाव पंपींग स्टेशन येथील वीज कनेक्शन दहिगाव येथून घेणे, करमाळा शहराची हद्दवाढ, मोकाट कुत्र्यांकरिता शेल्टर हाऊस उभा करणे, मोकाट जनावरे पकडून त्यांच्यावर कारवाई करणे स्वच्छतेबाबत ठोस पाऊले उचलणे, अभ्यासिका उभारण्यासाठी जागा उपलब्ध करणे यासह ३८ विषयांना करमाळा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने आज मंजुरी दिली आहे.

नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिरात पहिलीच सर्वसाधारण सभा झाली. मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी या सभेला उपस्थित होते.

प्रभाग १ ते १० अशा सर्वच प्रभागात विविध विकास कामे करणेबाबत यावेळी मंजुरी देण्यात आली. शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करणे, प्रभाग दोन मध्ये खुल्या जागेत श्री संत शिरोमणी सावता महाराज समाज मंदिर बांधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. याशिवाय विकास कामांची व शासकीय विविध योजना अनुदानापासून करावयाच्या कामांची निवड निश्चित करण्याबाबतही चर्चा झाली.

वैशिष्ट्येपूर्ण योजनाअंतर्गत मंजूर कामांच्या नावात बदल करणे यावरही या सभेत चर्चा झाली. करमाळा शहारात वृक्ष संवर्धन समितीची स्थापना करण्याचे ठरले आहे. सुभाष चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत व कसाब गल्ली ते कानाड गल्ली पर्यंत नवीन जलवाहिनी टाकणे यावरही चर्चा झाली. आवश्यकतेनुसार शहारत पाणी टाकी बसवणे व जलवाहिनीबाबतही यावेळीच चर्चा झाली.

प्रभाग ७ मध्ये स्वच्छतागृह याबाबतही यावेळी चर्चा झाली. शहरात ओपन स्पेस व उद्यानाची स्वछता करणे यासह चिमुकल्यांच्या उद्यानात रोज स्वच्छता करणे, आवश्यक त्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणे, टाऊनहॉल शेजारील रिकाम्या जागेत टाकण्यात आलेला राडारोडा त्वरित उचलावा याबाबतही चर्चा झाली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले स्वच्छ करण्याचेही यावेळी ठरवण्यात आले आहे.

करमाळा नगरपालिकेच्या शिक्षण मंडळांतर्गत असलेल्या शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करणे व संगणक संच बसवणे, नगरपालिकेच्या सर्व विभागाकडील सर्व कामांच्या निविदा काढण्याबातही यावेळी चर्चा झाली. याशिवाय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविणे व घनकचरा व्यवस्थापनसाठी मनुष्यबळ पुरवठा करण्याबाबतही यावेळीच चर्चा झाली. अशा ३८ विषयांना सभेनी मंजुरी दिली आहे.

करमाळा शहरातील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत अतिरिक्त वाहने मिळावीत यावरही यावेळी चर्चा झाली. तेव्हा पाच वाहने घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली असून सभेने त्याला मंजुरी दिली आहे. याशिवाय करमाळा शहरात विविध विकास कामे करण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येण्यावर चर्चा झाली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!