अमळनेर नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या हृदयात वसलेले डॉक्टर – डॉ. निखिल बहुगुणे

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या हृदयात वसलेले डॉक्टर.  डॉ. निखिल बहुगुणे

उत्तर महाराष्ट्रातील वैद्यकीय विश्वात ज्यांचे नाव घेताच विश्वास, आपुलकी आणि आशेची जाणीव होते असे हृदयरोग तज्ञ डॉ. निखिल बहुगुणे हे केवळ आजारांवर उपचार करणारे डॉक्टर नाहीत, तर रुग्णांच्या मनाला धीर देणारे एक आधारवड आहेत. अचूक निदान, योग्य सल्ला आणि परिणामकारक औषधोपचार यासोबतच त्यांच्या शब्दांतून उतरलेली माया अनेक वेळा औषधांपेक्षाही अधिक परिणामकारक ठरते. त्यांच्या एका संवादातूनच रुग्णाच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान हे त्यांच्या सेवाभावाचे खरे प्रमाणपत्र आहे.

दिनदलित, गरिबांचे खरे कैवारी म्हणून ओळख असलेले डॉ. बहुगुणे यांची रुग्णसेवा म्हणजे निखळ माणुसकीचा झरा आहे. गंभीर अवस्थेतील रुग्ण असो वा आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेला पेशंट प्रत्येकासाठी त्यांचे हृदय तितकेच कळवळते.

सिरीयस पेशंटसाठी स्वतः पुढाकार घेऊन नामांकित स्पेशालिस्ट हॉस्पिटल्सशी संवाद साधणे, योग्य उपचारांची दारे उघडणे आणि रुग्णाला नवजीवन देणे हे त्यांचे रोजचे कार्य बनले आहे. कोरोना महामारीच्या भयाण काळात तर डॉ. बहुगुणे यांनी देवदूताची भूमिका बजावली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले. घाबरलेल्या कुटुंबांना दिलेला धीर, रुग्णांना दिलेले बळ आणि अखंड सुरू असलेली सेवा यामुळे ते खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा ठरले. त्या काळात अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत आशेचा दिवा पेटवण्याचे काम त्यांनी केले.

अमळनेरच नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लाडके, सर्वांचे आवडते डॉक्टर, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असलेले डॉ. दादासाहेब निखिलजी बहुगुणे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अमळनेरकरांच्या सेवेसाठी त्यांचे हे माणुसकीचे हात असेच कार्यरत राहोत, त्यांच्या शब्दांतून आणि उपचारांतून अजून असंख्य जीवांना नवसंजीवनी मिळो हीच मनापासून सदिच्छा.

विक्की जाधव. मार्मिक समाचार 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!