इ. १० वी व १२ वी परीक्षा काळात तज्ञ समुपदेशकांची नियुक्ती

अपनी भाषा में पढ़े! Translate

इ. १० वी व १२ वी परीक्षा काळात तज्ञ समुपदेशकांची नियुक्ती

पुणे/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीतील परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, या उद्देशाने पुणे विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांमध्ये तज्ञ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाच्या सचिव डॉ. मिनाक्षी राऊत यांनी दिली.

इयत्ता १२ वीची परीक्षा दि. १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत, तर इयत्ता १० वीची परीक्षा दि. २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान होणार आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षासंबंधी अडचणी किंवा मानसिक तणाव जाणवल्यास सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत तज्ञ समुपदेशकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🟢तज्ञ समुपदेशकांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे—

पुणे:
योगिनी पाटील – ९९६०६४४४११
आशुमती देशपांडे – ७९७२५७३७४२
वृषाली आठवले – ९८३४०८४५९

बारामती:
श्रेया दिघे – ९३५९९७८३१५

अहिल्यानगर:
सुनील मोरे – ८१६९२०२२१४
सुजित भोसले – ९३७१६६१२५५
विजया कुलकर्णी – ७२०८४२९३८१

सोलापूर:
निकिता गडाख – ७७०९१५६०६८
सुजाता शिंदे – ८४२११५०५२८
वरदा रानडे – ९४०४७८३९९६

तसेच परीक्षा काळात मंडळासंबंधी माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांकही सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध असून,
इयत्ता १० वी: ९४२३०४२६२७
इयत्ता १२ वी: ७०३८७५२९७२
या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!