डॉ. डिगंबर महाले सर यांना राज्यस्तरीय बहुमान; महाराष्ट्र चेंबर्सच्या गव्हर्निंग कौन्सीलमध्ये विशेष नियुक्ती

अपनी भाषा में पढ़े! Translate

डॉ. डिगंबर महाले सर यांना राज्यस्तरीय बहुमान; महाराष्ट्र चेंबर्सच्या गव्हर्निंग कौन्सीलमध्ये विशेष नियुक्ती.

 

अमळनेर : विक्की जाधव.

राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्रातील सर्वोच्च व प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सीलमध्ये (स्पेशल इन्व्हायटी) निमंत्रित सदस्यपदी डॉ. डिगंबर महाले सर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. अमळनेरच्या इतिहासात प्रथमच हा मान मिळाल्याने शहराच्या औद्योगिक व बौद्धिक क्षेत्रात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

पुढील वर्षी महाराष्ट्र चेंबर्सच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असून, या शताब्दी वर्षानिमित्त उद्योग, व्यापार व विकासाभिमुख विविध भव्य उपक्रम राबविण्याची व्यापक तयारी संस्थेकडून सुरू आहे. या ऐतिहासिक टप्प्याच्या नियोजन व आयोजनासाठी अनुभव, दूरदृष्टी आणि कार्यक्षम नेतृत्व आवश्यक असल्याने डॉ. महाले यांची विशेष नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या अभ्यासपूर्ण योगदानामुळे संस्थेच्या उपक्रमांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक व व्यावसायिकांनी डॉ. डिगंबर महाले यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, अमळनेरसाठी ही निवड गौरवशाली ठरत असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!