महेंद्र रामोशे व मोहन पालवे यांची शिक्षकांच्या पतसंस्थेवर तज्ञ संचालक पदी निवड
अमळनेर : विक्की जाधव.
जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक महेंद्र रामोशे तसेच भुसावळ येथील तू. स. झोपे गुरुजी विद्यालयाचे उपशिक्षक मोहन कौतिक पालवे यांची निवड करण्यात आली आहे. जळगाव येथील पतसंस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. शिक्षक चळवळीत व सहकार क्षेत्रात अनुभव असलेल्या या दोघांच्या निवडीमुळे पतसंस्थेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षक, कर्मचारी व सहकार क्षेत्रातून महेंद्र रामोशे आणि मोहन पालवे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.