फार्मसी महाविद्यालयात प्रश्नमंजूषेची रंगत; ज्ञान, कौशल्य आणि स्पर्धेचा सुरेख संगम

अपनी भाषा में पढ़े! Translate

फार्मसी महाविद्यालयात प्रश्नमंजूषेची रंगत; ज्ञान, कौशल्य आणि स्पर्धेचा सुरेख संगम

 

अमळनेर: विक्की जाधव 

खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी व प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी येथे आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शैक्षणिक वातावरणात चैतन्य निर्माण करणाऱ्या या स्पर्धेदरम्यान प्रा. देवेश भावसार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत “केवळ पदवी नव्हे, तर कौशल्याधारित ज्ञानच भविष्यात यशाची गुरुकिल्ली ठरेल,” असा संदेश दिला. प्रश्नमंजूषेमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, अभ्यासातील खोली आणि स्पर्धात्मक तयारीला चालना मिळाल्याचे चित्र दिसून आले.

मार्गदर्शन करताना प्रा. भावसार यांनी औषधनिर्मिती क्षेत्रातील बदलते स्वरूप अधोरेखित करत, “आजच्या फार्मसी विद्यार्थ्याने औषधांचे केवळ नाव नव्हे, तर त्यांची रेणवीय रचना, कार्यपद्धती व मानवी शरीरावर होणारे परिणाम समजून घेणे अत्यावश्यक आहे,” असे स्पष्ट केले. अशा उपक्रमांमुळे पुस्तकांच्या चौकटीबाहेर जाऊन प्रत्यक्ष ज्ञानाची कसोटी लागते, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास प्रा. अनिल बोरसे, प्रा. स्वप्नाली महाजन, प्रा. गीतांजली पाटील, प्रा. प्रगती पाटील, प्रा. हर्षदा पवार, प्रा. वैशाली कुलकर्णी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना फार्मसीचे चेअरमन योगेश मुंदडे व प्राचार्य प्रा. डॉ. रविंद्र सोनवणे यांनी, “अशा स्पर्धांमधून भावी संशोधक आणि तज्ज्ञ घडत असल्याचे समाधान मिळते,” असे मत व्यक्त केले. त्यांनी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!