प्रभाग १०-अ मध्ये गोपी भाऊ कासार उद्या भरणार नामांक समर्थकांमध्ये गोपी भाऊंच्या उमेदवारीने उत्सुकता
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक १०-अ मधून नगरसेवक पदासाठी गोपी भाऊ आपल्या उमेदवारीची अधिकृत नोंद उद्या (१७ नोव्हेंबर २०२५) करणार आहेत. सकाळी दुर्गा माता मंदिर येथून शुभाशीर्वाद घेत ते मोठ्या समर्थकांच्या उपस्थितीत अमळनेर नगरपरिषदेकडे नामांकन भरण्यास जाणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभागात होत असलेल्या भेटीगाठींतून मिळणारा जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद त्यांच्या उमेदवारीला विशेष उंची देत आहे.
प्रभाग १०-अ मध्ये विकासाचा निर्धार, सर्व समाजांशी नाळ जुळवणारी कार्यशैली आणि नेहमी उपलब्ध असणाऱ्या नेतृत्वामुळे गोपी भाऊ यांची ओळख ‘प्रभागाचा आपला माणूस’ अशी निर्माण झाली आहे. रस्ते, स्वच्छता, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आणि युवकांच्या रोजगाराच्या संधी या सर्व प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. “ प्रभागातला काम करणारा नेता !” असा स्वर जनतेतून जोरात उमटताना दिसत आहे, आणि हा विश्वासच त्यांच्या उमेदवारीला अधिक ताकद प्रदान करतो.उद्या नामांकन प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात समर्थक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. प्रभागातील महिलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी गोपी भाऊंना भरभरून शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या विजयाबाबत प्रभागात आशावादाचे वातावरण आहे. उत्साह, विश्वास आणि विकासाचा निर्धार या तीनही गोष्टींवर आधारलेली ही उमेदवारी प्रभाग १०-अ मध्ये परिवर्तनाची नवी दिशा देण्यास सज्ज झाली आहे.