बँकिंगमध्ये ऐतिहासिक बदल: आजपासून ‘फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टिम’ लागू, ग्राहकांना तात्काळ मिळणार पैसे!
मुंबई/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
भारतीय बँकिंग क्षेत्रात आजपासून (४ ऑक्टोबर २०२५) एक मोठा आणि ऐतिहासिक बदल लागू झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ‘फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टिम’ सुरू केली असून, त्यामुळे चेक व्यवहार आता अधिक वेगाने पूर्ण होणार आहेत. यामुळे चेक भरल्यानंतर दिवसें-दिवस पैसे येण्याची वाट पाहण्याचा काळ आता संपणार आहे.
नवीन प्रणालीमुळे ग्राहकांच्या खात्यात त्याच दिवशी पैसे जमा होतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. RBI ने यासाठी Continuous Cheque Clearing Mode लागू केला असून, सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत जमा होणारे चेक स्कॅन करून तात्काळ क्लिअरिंग हाऊसकडे पाठवले जातील.
🔴चेक क्लिअरन्सची नवीन वेळापत्रक :
1. पहिला टप्पा : ४ ऑक्टोबर २०२५ ते २ जानेवारी २०२६
2. बँकांना चेक पुष्टीसाठी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत वेळ
3. दुसरा टप्पा : ३ जानेवारी २०२६ पासून
4. बँकांना केवळ ३ तासात चेक कन्फर्म करावा लागेल
5. वेळेत उत्तर न दिल्यास चेक आपोआप क्लिअर होईल
🟢सुरुवात महानगरांपासून :
हा नियम दिल्ली, मुंबई, चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांतील क्लिअरिंग ग्रिडवर प्रथम लागू केला जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
🟣ग्राहक आणि व्यावसायिक दोघांनाही मोठा फायदा :
1. या बदलामुळे चेक व्यवहारांतील अनिश्चितता कमी होईल आणि व्यवहारांचे निवारण त्वरीत होईल.
2. ग्राहकांना वेळेत पैसे मिळतील
3. व्यवसायिकांना कॅश फ्लोची अचूक योजना करता येईल
4. संपूर्ण बँकिंग प्रणाली अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनेल
🟡फसवणुकीला आळा – पॉझिटिव्ह पे सिस्टिम बंधनकारक :
रिझर्व्ह बँकेने मोठ्या रकमांच्या चेकसाठी Positive Pay System अनिवार्य केली आहे. यात ग्राहकांनी चेकचे तपशील (जसे की रक्कम, तारीख, प्राप्तकर्ता) आधीच बँकेला कळवणे आवश्यक आहे. त्यामुळे फसवणुकीच्या घटना टळतील आणि चुकीचे चेक क्लिअर होणार नाहीत.