सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका लवकरच लागणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका.

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका लवकरच लागणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका.

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : 

सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दणका देत स्पष्ट आदेश दिला आहे की महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण व्हायलाच हव्यात. यामध्ये महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींचा समावेश असून, निवडणुका लांबणीवर टाकण्यास सरकारला परवानगी दिली जाणार नाही.

राज्यातील अनेक ठिकाणी निवडणुका प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज प्रशासकांच्या हाती सोपवण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे आता निवडणूक आयोग आणि सरकारला निवडणूक कार्यक्रम जाहीर करून तातडीने प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना रणांगण सजवण्याची संधी मिळाली आहे.या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापणार असून, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांसाठी ही मोठी कसोटी ठरणार आहे.

 

अमळनेरमध्येही निवडणुकीची जोरदार चाहूल 

शहरातील दोन जुन्या पॅनलसमोर आता तिसऱ्या नवीन पॅनलची जोरदार तयारी सुरू असून, या पॅनलमध्ये आजी-माजी पदाधिकारी, नवीन कार्यकर्ते आणि एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीचा वरदहस्त असल्याचे सांगितले जात आहे. नगरपालिका काबीज करण्यासाठी या पॅनलकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असून, सत्ता असल्यामुळे राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, दोन जुने पॅनल शहरभर परिचित असून तेही नवीन उमेदवारांना संधी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे उमेदवारांची मनधरणी रंगणार असून काही ठिकाणी जुने कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अमळनेर नगराध्यक्ष पदासाठीही नवनवीन चेहरे पुढे येत असल्याने आगामी दिवसांत राजकीय वातावरण तापणार असून जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे चित्र अधिक स्पष्ट होत जाणार आहे.

वाचत रहा फक्त मार्मिक समाचार 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!