इंदापूर तालुका ५४ फाटा येथे वाहन तपासणी मोहीम; फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांची कारवाई;पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधरी
(निलेश गायकवाड)
इंदापूर तालुक्यातील ५४ फाटा येथे वाहतुकीवर शिस्त आणण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक तपासणी मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत वाहनचालकांची लायसन्स, तात्पुरता नोंदणी क्रमांक (TR नंबर), विमा, आरसी बुक व प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र (झणउ) यांसह इतर आवश्यक कागदपत्रे तपासण्यात आली. तपासणीदरम्यान काही वाहनांवर आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. तसेच काही गाड्यांवर नंबर प्लेट नसल्याचे व काही वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट
बसविल्याचे समोर आले. फॅन्सी नंबर प्लेट म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, निऑन रंगात, चित्र अथवा स्टिकर लावून किंवा वेगळी फॉन्ट वापरून बनविलेल्या नंबर प्लेट. महाराष्ट्र शासन व ठढज आदेशांनुसार अशा प्रकारच्या फॅन्सी प्लेट्स बेकायदेशीर आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी जागीच दंडात्मक कारवाई केली. काही वाहनचालकांना कठोर सूचना देण्यात आल्या तर नियमभंग गंभीर आढळल्यास वाहन जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधरी यांनी सांगितले की, वाहनचालकांनी वाहनावर केवळ सरकारी नियमांनुसार मान्य असलेली नंबर प्लेटच वापरावी. खाजगी वाहनांसाठी पांढऱ्या पाटीवर काळा अक्षर,व्यावसायिक वाहनांसाठी पिवळ्या पाटीवर काळा अक्षर तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी हिरव्या पाटीवर पांढरा/पिवळा अक्षर हा नियम बंधनकारक आहे. TR नंबर घेतल्यानंतर ठराविक कालावधीत कायमची नोंदणी करून परवाना घेणे आवश्यक आहे. पॅन्सी नंबर प्लेट वापरणे आता पूर्णपणे बंद आहे.
नागरिकांनी वाहन चालवताना लायसन्स, RC/TR, विमा व झणउ ही कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावीत आणि सुरक्षिततेसाठी हेल्मेट/सीट बेल्ट यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. या मोहिमेमुळे परिसरातील वाहनचालकांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. पोलिसांनी पुढील काळात अशा प्रकारच्या मोहीम सुरूच राहतील असे स्पष्ट केले आहे. करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. पोलिसांनी पुढील काळात अशा प्रकारच्या मोहीम सुरूच राहतील असे स्पष्ट केले आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.पोलिसांनी अशीच मोहीम पुढे सुरु राहील असे स्पष्ट केले आहे.