न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

अमळनेर तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंच्या शहराध्यक्ष पदी नरेश कांबळे तर तालुकाध्यक्ष पदी अरुण मोरे यांची निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंच्या शहराध्यक्ष पदी नरेश कांबळे तर तालुकाध्यक्ष पदी अरुण मोरे यांची निवड

 

अमळनेर : विक्की जाधव.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघ अमळनेर तालुक्याची अमळनेर शहर व तालुका कार्यकारिणी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली.अमळनेर शहर तालुकाध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक नरेश कांबळे तर तालुकाध्यक्ष म्हणून अरुण मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

शनिवारी माळी मढीजवळ असलेल्या बहुउद्देशीय सभागृहात राष्ट्रीय चर्मकार महासंघाची बैठक घेण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यप्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, राज्य कार्यकारिणी सदस्य धनराज पवार,जळगाव जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे,जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष दिपक अनुष्ठान, जिल्हा सचिव लक्ष्मण महाले,जिल्हा संघटक धनराज मोरे,धरणगाव तालुकाध्यक्ष दिलीप वाघ, दयाराम मोरे,प्रदीप वाघ,देविदास बोरसे उपस्थित होते.श्री संत रोहिदास,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज,महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.भानुदास विसावे,पांडुरंग विसावे,धनराज पवार,दिपक अनुष्ठान, ईश्र्वरलाल अहिरे आदींनी उपस्थित समाजाला आपले मत मांडून आजच्या डगमगलेल्या स्थितीत आपण समाजाने कोणताही भेदभाव न करता संघटित राहून समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी मैदानात उतरण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले.

अमळनेर शहर तालुकाध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक नरेश कांबळे,उपाध्यक्ष गणेश जाधव,सचिव सुनील मोरे,अमळनेर तालुकाध्यक्ष म्हणून अरुण मोरे,उपाध्यक्ष प्रवीण वाघ,निवृत्ती बागुल,सचिव सागर मोरे,युवा तालुकाध्यक्ष रविंद्र ठाकरे,उपाध्याय विनोद जाधव,सचिव रवींद्र साळुंखे, अधिकारी कर्मचारी अध्यक्ष संजय मोरे,उपाध्यक्ष विलास बिऱ्हाडे,डॉ.माणिक बागले,सचिव वसंत मोरे,महिला अध्यक्ष उषा देवरे,उपाध्यक्ष भारती कार्लेकर,सुरेखा मोरे,सचिव प्रियंका अहिरराव यांची एकमताने निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय बिऱ्हाडे तर आभार प्रदर्शन दंगल सोनवणे यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!