June 29, 2025 1:53 am

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या असलम अली वर  कारवाईची मागणी: हिंदूत्ववादी संघटना आक्रमक 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या असलम अली वर  कारवाईची मागणी: हिंदूत्ववादी संघटना आक्रमक 

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी अमळनेरात संताप; हिंदू संघटना व भाजपतर्फे पोलिसांना निवेदने

 

अमळनेर : विक्की जाधव.

चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेनंतर अमळनेर शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर हिंदूत्ववादी संघटना आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी एका दिवसात दोनदा  पोलिसांना निवेदने सादर करत आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.

चोपडा तालुक्यातील पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी रऊफ बँडचे मालक असलम अली (वय २९, रा. सराफ बाजार, अमळनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अमळनेर परिसरात तीव्र निषेध होत असून, रऊफ बँडच्या वाहनावर कारवाई करण्याबरोबरच त्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले.

सकाळी भाजपच्या वतीने मोर्चा काढून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप अमळनेर मंडळ अध्यक्ष योगेश महाजन, जानवे मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील, पातोंडा मंडळ अध्यक्ष राहुल पाटील, शिंदे सेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जमाव आक्रमक होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रऊफ बँडच्या वाहनाची तात्काळ जप्ती करण्याची मागणी करण्यात आली.

सायंकाळी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजपच्या इतर कार्यकर्त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यावर धडक दिली.

सकाळी निवेदन देण्यास सहभागी असलेल्या काही कार्यकर्त्यांनीही सायंकाळी पुन्हा सहभाग घेतला. त्यांनी हा प्रकार लव जिहादशी संबंधित असल्याचा आरोप करत, आरोपीविरुद्ध गोपनीय चौकशी करण्याची मागणी केली. याप्रकरणात आणखी काही मुली अडकल्या असल्याची शक्यता वर्तवून त्यांची सुटका करण्याची मागणीही करण्यात आली.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी रऊफ बँडच्या वाहनामध्ये बेकायदेशीर बदल किंवा नियमबाह्य बाबी आढळल्यास आरटीओमार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या घटनेची चौकशी अधिक सखोलपणे व्हावी आणि कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गाने कार्यवाही व्हावी, असे सामाजिक स्तरावरूनही आवाहन होत आहे.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!