दहावीचा निकाल: लातूर जिल्ह्याचे वर्चस्व, कोकण विभाग राज्यात अव्वल

अपनी भाषा में पढ़े! Translate

दहावीचा निकाल: लातूर जिल्ह्याचे वर्चस्व, कोकण विभाग राज्यात अव्वल

 

मार्मिक न्यूज नेटवर्क: विक्की जाधव

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात यंदा 211 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवून इतिहास रचला आहे. यामध्ये लातूर जिल्ह्याने बाजी मारली असून, एकट्या लातूरमधील तब्बल 113 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत.

दुसरीकडे, राज्यातील 285 विद्यार्थी 35 टक्के गुणांवर पास झाले आहेत. काठावर पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक संख्या पुणे विभागात नोंदवण्यात आली आहे.

विभागनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे:

कोकण: 98.82% (राज्यात सर्वोच्च)

कोल्हापूर: 96.78%

मुंबई: 95.84%

पुणे: 94.81%

नाशिक: 93.04%

अमरावती: 92.95%

संभाजीनगर: 92.82%

लातूर: 92.77%

नागपूर: 90.78% (राज्यात सर्वात कमी)

या निकालातून कोकण विभागाने पुन्हा एकदा आपले शैक्षणिक वर्चस्व सिद्ध केले आहे, तर लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!