January 31, 2025 1:29 pm

नीरा नरसिंहपूर परिसरामध्ये चाललेली अवैध माती विक्री, दारू विक्री, गांजा विक्री व मटका माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंद करणार का?

अपनी भाषा में पढ़े! Translate

नीरा नरसिंहपूर परिसरामध्ये चाललेली अवैध माती विक्री, दारू विक्री, गांजा विक्री व मटका माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंद करणार का?

इंदापूर दिनांक-10/12/2024
प्रतिनिधी :समाधान रजपूत.

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असलेल्या निरा नरसिंहपुर गावांमध्ये अवैधरित्या मातीचे उत्खनन चालू आहे. त्याचप्रमाणे दारू विक्री, मटका आणि गांजा विक्री हे भरपूर प्रमाणात होत असून येथील अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांना राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे त्याचप्रमाणे त्यांचे हप्ते चालू असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे भय राहिले नाही.
अशा अवैध दारू विक्रीमुळे गावातील वातावरण हे दूषित होत आहे . शालेय विद्यार्थ्यांना तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
येथील काही माती सम्राटांनी शेतातील अवैधरित्या मातीचे उत्खनन केलेले आहे व उत्खनन चालू आहे तरी नरसिंहपूर येथील तलाठी व त्यांचा कोतवाल हे आर्थिक लागेबंदीमुळे शांत आहेत. यामध्ये तहसीलदार यांनी लक्ष घालून आत्तापर्यंत विक्री झालेल्या माती वरती व चालू असलेल्या विक्रीसाठी जी माती आहे त्याच्यावरती कार्यवाही करावी अशी जनतेतून मागणी आहे.
नीरा नरसिंहपूर परिसरामध्ये आत्तापर्यंत गांजा विक्रीसाठी बरेच केसेस झालेले आहेत आणि येथे खुलेआमपणे गांजा विक्री केली जात आहे. तरी पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष घालून हा अवैद्य प्रकार थांबवला पाहिजे. अशा गांजा विक्रीमुळे युवा पिढी बरबाद होत आहे आणि त्याच्यावर आळा घालण्यासाठी गांजा विक्री वरती बंदी आली पाहिजे.
नीरा नरसिंहपूर परिसरामध्ये मटक्याचा व्यवसाय हे दोन आहेत आणि त्याच्यामुळे तरुण वर्ग, लहान वर्ग तसेच वृद्ध वर्ग सर्व स्तरातील लोकांमध्ये मटक्याचे व्यसन लागलेले आहे तरी हे मटका व्यावसायिक हे राजकीय वरदहस्त असल्यामुळे चालत आहेत तरी ते बंद झाले पाहिजेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
वरील प्रकारे माती विक्री, दारू विक्री, मटका त्याचप्रमाणे गांजा विक्री यामुळे निरा नरसिंहपुर गाव हे पवित्र तीर्थक्षेत्र असूनही अशा व्यवसायामुळे मलीन होत आहे . तरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार दत्तामामा भरणे तसेच पोलीस प्रशासन यांच्या साह्याने हे अवैध व्यवसाय लवकरात लवकर बंद करावे अशी निरा नरसिंहपूर परिसरातील ग्रामस्थांची आणि विशेष करून महिलांची मागणी आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!