January 30, 2025 10:48 pm

राज्यात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात!

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्यात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात!

मुंबई(विशेष प्रतिनिधी : वर्षा चव्हाण)

५ डिसेंबर २०२४ (गुरुवार) रोजी महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षणी आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानात
संपन्न झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या भव्य शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देशातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

महायुती सरकारच्या या शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज आणि तब्बल चाळीस हजार नागरिकांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन विक्रम केला आहे.म्हणजेच आता राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!