November 21, 2024 10:33 pm

अमळनेर मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचा चेहरा माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासाठी एकवटल्या लाडक्या बहिणी 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचा चेहरा माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासाठी एकवटल्या लाडक्या बहिणी

कविता पाटलांसह लाडक्या बहिणींनी दिला ‘अबकी बार शिरीषदादा आमदार’चा नारा

 

अमळनेर : विक्की जाधव

लाडक्या बहिणी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत चेहरा असलेल्या माजी आमदार शिरीषदादा चौधरी या लाडक्या भावासाठी सरसावल्या असून ‘ अबकी बार शिरीषदादा आमदार’चा नारा देत महाविजयाचा निर्धार केला आहे.

पंचायत समितीच्या माजी सदस्य कविता प्रफुल्ल पाटील म्हणाल्या की, सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून शिरीषदादा चौधरी यांनी अमळनेर विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे केली. ही विकासकामे अशीच अखंडितपणे सुरू राहावीत यासाठी अमळनेर मतदारसंघाचा शाश्वत विकासाचा चेहरा असलेल्या शिरीषदादा चौधरी यांनाच यावेळी काम करण्याची संधी द्या. येत्या २० तारखेला अनु क्रमांक ११ वरील ‘बॅट’ला मतदान करा. लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावासाठी चला एकत्र येवू या, असे आवाहन त्यांनी केले.

 

शिरीषदादांनी २०१४ पासून राजकारणातून लोकसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे.

जातपात किंवा पक्षभेद न करता त्यांनी सर्व समाजांना सोबत घेत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. मतदारसंघवासीयांचे जीव वाचावेत म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य सर्वश्रृत आहे. मात्र ज्यांनी जातीचा वापर करून आमदारकी व नंतर मंत्री पद मिळवले त्यांच्या डोक्यात मंत्रीपदाची हवा गेली. त्यांनी जात, समाज आणि मतदारसंघाकडे पाठ फिरवत मंत्रीपदासाठी माती खाल्ली.

पीक विमा, दुष्काळी निधीसाठी शेतकरी हवालदिल आहेत.

कष्टकरी, कास्तकरी विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार वाऱ्यावर आहेत. , महिलांसाठी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच वर्षाच्या कालावधीत छेडखानीच्या प्रकारासंह गुंडगिरीने कळस गाठला आहे. प्रशासनावर आणि पोलिस यंत्रणेवर नियंत्रण राहिलेले नसून कमिशन आणी टक्केवारीकडे मंत्री महोदयांचे चित्त आहे. मर्दानी छातीचा पोलादी मनगटाचा शिरीषदादा यांच्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात महिला व मुलींसाठी सुरक्षिततेचे व भयमुक्त वातावरण होते. आमदारच होता पण दरारा आणि कामे मंत्र्यापेक्षा जास्त होते. शेतकरी, कष्टकरी, कास्तकरी, विद्यार्थी, महिला, मुली यांच्यासाठी पोषक वातावरण होते. त्यांच्याकडे काम घेऊन गेलेल्या कोणाचाच पाणउतारा होत नव्हता. प्रत्येकाची समस्या समजून घेत ती सोडवण्यापर्यंत शिरीषदादांचा पाठपुरावा असायचा. वैद्यकीय सेवेबाबत मुंबई, दिल्ली आणि देशातील इतर राज्यात जाणाऱ्या रूग्णांसुद्धा मदत होती. मात्र येथे डीपीच्या मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्री महोदयांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. पीक विम्यासाठी तरसावले जाते. तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुका म्हणून केला जात नाही. आपत्ती निवारण आणि मदत व पुनर्वसन या खात्याचा मतदारसंघासाठी उपयोग केला जात नाही. स्वत:ला स्थािनक आणि भूमिपुत्र म्हणून घेणारे समाजावर आणि मतदारसंघावर सूड उगवत आहेत. निवडणुका येताच आता समाजाची आठवण त्यांना येत आहे. मात्र त्यांचे खायचे वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत याची जाणीव समाजासह मतदारसंघाला झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपला खरा पाठिराखा आणि अमळनेर मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचा खरा चेहरा असलेल्या शिरीषदादांसाठी एकवटल्या आहेत. लाडक्या बहिणींनी ‘अबकी बार शिरीषदादा आमदार’चा नारा देत महाविजयाचा निर्धार केला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!