500 चा स्टॅम्प पेपर नसेल तर 100 रुपयांचे 5 वापरा; नोंदणी व मुद्रांक शुल्कचे स्पष्टीकरण.
विशेष प्रतिनिधी : वर्षा चव्हाण
100 ते 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची किंमत आणि प्रत्यक्षात त्यांची छपाईसाठी येणार खर्च हा जास्त असल्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून हे स्टॅम्प बंद करण्यात आले होते. तसा निर्णय राज्य सरकारने दिला होता.
प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र अथवा अन्य प्रकाराचे दस्ताऐवज करण्यासाठी 500 रुपयांचे स्टॅम्प पेपरच वापरण्याचे बंधन राज्य सरकारने घेतले होते. परंतु या स्टॅम्पचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून, नागरीकांना 100 रुपयांचे 5 स्टॅम्प पेपर वापरून आपले काम करणे शक्य आहे. अशा सूचना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून मुद्रांक विक्रेत्यांना दिल्या आहेत.
राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात मान्यता देत महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात बदल केला. या निर्णयामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना 100 अथवा 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपर ऐवजी प्रत्येक कामासाठी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे बाजारात गेल्या काही दिवसांपासून 500 रूपयांचा पुरेशा प्रमाणात पुरवठा न झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे.