June 29, 2025 7:14 pm

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील धनुर्धर खेळाडू शिवम चिखले याची राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत राज्यात प्रथम

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या अंतर्गत 19 व 20 ऑक्टोंबर 2024 रोजी नांदेड येथे घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील खेळाडू शिवम राजेंद्र चिखले याने स्पर्धेमध्ये दैदिप्यमान कामगिरी करून राज्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. सतरा वर्ष वयोगट मुले रिकर्व्ह या प्रकारांमध्ये ६० मीटर अंतरावर ३३३ गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पदक व दुसऱ्या ६० मीटर अंतरावर ३३२ गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्यपदक तर एकूण अंतिम गुणांकामध्ये राज्यात प्रथम येऊन त्याने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच बरोबर एलिमेशन राउंड या प्रकारामध्ये पुणे विभागात सुवर्णपदक पदक प्राप्त करून देण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. अशा प्रकारे त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण व एक रौप्य पदकाची कमाई करून दाखविली. आत्तापर्यंतच्या चालू असलेल्या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पदकाची कमाई करणारा शिवम चिखले हा एकमेव खेळाडू ठरला असून त्याला या स्पर्धेमध्ये प्रा. राम काळे यांचे मार्गदर्शन लाभले. शिवम याची ११ नोहेंबर २०२४ रोजी नाडियाड ( गुजरात) येथे होनाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे .
या खेळाडूने महाविद्यालयाचे नाव राज्य पातळीवर झळकवले आहे . अशा अतिशय महत्वाच्या कामगिरी बद्दल यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!