June 29, 2025 2:54 am

“जातीय समीकरणाची विकासावर कुरघोडी” होत असल्याने कृषिभूषण साहेबराव खेळणार नवा डाव

अपनी भाषा में पढ़े! Translate

“जातीय समीकरणाची विकासावर कुरघोडी” होत असल्यामुळे सध्या स्थिती जे कल होते.. तेच चांगले होते ते मी नाही, वेळच सांगेल. विधानसभा २०२४ कृषीभूषण साहेबराव पाटील.

 

अमळनेर : विक्की जाधव.

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यातच अमळनेर विधानसभा अपवाद ठरणार का नक्कीच नाही घोडे मैदान गाजवण्यासाठी अमळनेर विधानसभा क्षेत्रात इच्छुकांची भाऊ गर्दी तर आहेच यात माजी आमदार कृषीभूषण हे अमळनेर विधानसभा क्षेत्रात कोणती खेळी करतात याकडे लक्ष लागून आहे.

मार्मिक समाचार सोबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मला जनता नाकरणार नाही. माझा जनतेवर विश्वास आहे.

“मै आया नहीं लाय गया हूँ.” असे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले.

येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल असे कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात उधार जनता कोठे असेल तर अमळनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे इथल्या बहुतांश जनतेला फक्त विकास हवा असाच वाटतं. 

सन 2009 ते 2014 या कालावधीसाठी “नको कोणता राजकीय पक्ष – जनता जनार्दन हाच पक्ष” विकासासाठी मला अपक्ष निवडून दिले होते. तर नंतर 2016 ते 2021 या कालावधीसाठी लोकनियुक्त नगराध्यक्षपदी” आघाडीतून निवडून दिले होते एखाद्या व्यक्तीकडून एखादी दिव्यशक्ती कार्य कसे करून घेते याचा आम्हास भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज क्षणोक्षणी अनुभव येतो. आमचा अधिकार नसतानाही आमच्या हातून जनहितार्थ अनुकरणीय कार्य असे घडले हे महाराज जाणतात. आम्हाला कसलाही राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वावर उच्च स्थानी आम्ही दोघी आपल्या कार्यातून व्यक्तित्वाची अमित छाप सोडली आहे.

 

 “जातीय समीकरणाची विकासावर कुरघोडी” होत असल्यामुळे सध्या स्थिती जे कल होते…. तेच चांगले होते ते मी नाही, वेळच सांगेल यात शंका नाही. 

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!