June 29, 2025 8:09 am

आज राज्यात दुखवटा जाहीर! भारताचा अनमोल ‘रत्न’ हरपला!

अपनी भाषा में पढ़े! Translate

आज राज्यात दुखवटा जाहीर! भारताचा अनमोल ‘रत्न’ हरपला!

मुंबई(विशेष प्रतिनिधी : वर्षा चव्हाण)

देशातील उद्योगविश्वाचे शिल्पकार आणि टाटा ग्रुपचे प्रमुख रतनजी टाटा यांचं बुधवारी(9ऑक्टोंबर 2024)रात्री दिर्घ आजारणे निधन झालं. त्यामुळे संपूर्ण देश हळहळला आहे.रतन टाटा यांचं वय 86 वर्ष होतं. तसेच, रतनजी टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रतनजी टाटा यांच्या निधनामुळे राज्यात आज (10 ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

🫡 जाणून घेऊयात रतन टाटांची थोडक्यात कारकीर्द :-

रतनजी टाटा 1961 च्या दरम्यान टाटा स्टील कंपनीत सामान्य कर्मचारी म्हणून रुजू झाले होते.
1991 मध्ये रतनजी टाटा यांची टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी निवड झाली.
रतनजी टाटांकडे टाटा समूहाचं चेअरमनपद आल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांनी स्वतःची हिस्सेदारी वाढवली.
1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार टाटा मोटर्सने बनवली. तसेच अशा पद्धतीची कार तयार करणं हे रतनजी टाटांचं स्वप्न होतं.
यानंतर एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पना त्यांना सुचली.
2008 मध्ये रतनजी टाटांच्या मार्गदर्शनात टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली, त्यामुळेच रतनजी टाटांना नॅनो कारचे जनक असंही म्हटलं जाते.
2012 मध्ये रतनजी टाटांनी टाटा समूहाच्या चेअरमनपदाचा राजीनामा देऊन सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला.मात्र सायरस मेस्त्रींबरोबर वाद झाल्याने 2016 मध्ये रतनजी टाटा पुन्हा एकदा टाटा समूहाच्या चेअरमनपदी रुजू झाले.
तसेच रतनजी टाटा यांना 2008 मध्ये पद्मविभूषण आणि 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आलं होतं.

 

📜रतनजी टाटा यांनी लग्न केलं नव्हतं त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या टाटा सन्सचा वारसदार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे….

सध्या एन. चंद्रशेखर हे टाटा समूहाच्या टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य व्यवसायाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.रतनजी टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत.
सध्याच्या परिस्थितीत रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांच्याकडे हा वारसा येऊ शकतो. त्यांची तीन मुलं, माया, नेव्हिल, लिआ टाटा हे संभाव्य उत्तराधिकारी असू शकतील.

✦ माया टाटा – 34 वर्षीय माया टाटा या सध्या टाटा समूहात उच्च पदावर कार्यरत आहे. ती Bayes Business School, University of Warwick मधून शिकलेली आहे. तीने टाटा अपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजिटल संस्थांमधील प्रमुख पदी काम केले आहे. तर टाटाच्या नवीन ॲप लाँचमध्ये तिची विशेष भूमिका आहे.

✦ नेव्हिल टाटा – नेव्हिल टाटा हा सध्या 32 वर्षांचा आहे. तो टाटा समूहाच्या कौटुंबिक व्यवसायात सक्रिय आहे. टोयोटा किर्लोस्कर समूहाच्या मानसी किर्लोस्कर हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली आहे. तो सध्या स्टार बाजारचा प्रमुख आहे. त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नेव्हिल याच्यावर आहे.

✦ लिआ टाटा – 39 वर्षीय लीह टाटा ही टाटा समूहाच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात अग्रेसर आहे. स्पेनमधील IE बिझनेस स्कूलमधून तिने शिक्षण पूर्ण केले आहे. लीहने टाटा हॉटेल्स, रिसॉर्टस आणि पॅलेसमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. सध्या ती समूहातील भारतीय हॉटेल्सचे व्यवस्थापन सांभाळत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!