June 30, 2025 7:50 am

शहरातील नवदुर्गा ची नवरात्रीनिमित सती माता मंदिरावर दुर्गादौड 

अपनी भाषा में पढ़े! Translate

शहरातील नवदुर्गा ची नवरात्रीनिमित सती माता मंदिरावर दुर्गादौड 

 

अमळनेर : विक्की जाधव. 

६ रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास आदिशक्ती देवीची आरती करून शेकडो महिलांनी तिरंगा चौक येथून  दुर्गादौड काढली. डीजे लावून महिला भक्तिमय वातवरणात देवीची आराधना करत पायी निघाल्या. कुऱ्हे गावाजवळ असलेल्या सती माता मंदिरावर पोहचल्यावर त्या ठिकाणी देवीची आरती करण्यात आली. तेथे खण ,नारळ आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांनी देवीची ओटी भरण्यात आली. यावेळी हभप राधाताई पाटील भोलाणेकर यांनी प्रबोधनपर कीर्तनातून महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी. वेलनेस अँबेसॅडर रेखाताई चौधरी,  निशा दुसाने , माधुरी पाटील , नेहा देशपांडे , विद्या शहा , योगिता पांडे हजर होत्या.

या कार्यक्रमासाठी स्पार्क फौंडेशन ,पंकज दुसाने , त्रिवेणी महिला मंडळ व इतर महिला मंडळाचे तसेच नीता कांबळे , रत्ना चौधरी , उज्वला मालपुरे , रेखा बागुल , सरला चौधरी , सरला शिंपी ,समिता भामरे ,स्वप्ना पाटील , शीतल ठाकूर , माया सोनार , लता दुसाने , करूणा सोनार , नीता डेरे ,नूतन भामरे , अर्चना शहा , विमल डेरे , मोहिनी सोनार यांचे सहकार्य लाभले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!