भिलारवाडीचे बाळासाहेब काटे सर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान.
कै.विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय संस्था निमगाव ता. माढा जि. सोलापूर यांचे एस.यु राजेभोसले हायस्कूल जिंती चे मुख्याध्यापक सन्माननीय बाळासाहेब काटे यांना “तालुकास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार” सपत्नीक करमाळा येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय संजय मामा शिंदे साहेब यांचे शुभ हस्ते देण्यात आला. श्री एस.यू .राजे भोसले विद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढी बरोबरच विविध विधायक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल व अत्यंत कुशलतेने सर्व घटकांना विश्वासात घेऊन शाळेचे व्यवस्थापन चालवल्याबद्दल सरांना हा पुरस्कार देण्यात आल्याबद्दल आम्हा सर्वांनाच त्याचं कौतुक आहे. अशा प्रकारच्या पुरस्कारामुळे काम करण्याची सकारात्मक ऊर्जा नेहमीच मिळते अशा प्रकारचा मनोदय सन्माननीय बाळासाहेब काटे सरांनी व्यक्त केला व भविष्यातही चांगले काम करू अशा प्रकारची ग्वाही सन्माननीय सरांनी दिली. सन्माननीय सरांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिंती पंचक्रोशीतील विविध स्तरातील मान्यवरांकडून सरांचे अभिनंदन केले जात आहे.