बारामतीचा झापुक झुपुक फेम सुरज चव्हाण बिग बॉस मराठी ५ चा विजेता!
बारामती(प्रतिनिधी : वर्षा चव्हाण)
‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. आज 70 दिवसांच्या या खेळाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
बिग बॉस मराठी 5 या पर्वाचा विजेता कोण होईल याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र आज बिग बॉस मराठी सिझन 5 चा विजेता मिळाला आहे. तर सुरज चव्हाण हा स्पर्धक बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे.
यावेळी विजेत्या स्पर्धकाला ट्रॉफीसह 14 लाख रुपयांचा धनादेश तसेच ज्वेलरी खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपये व इलेक्ट्रिक स्कुटर बक्षीस म्हणून मिळाले आहेत.
यावेळी टॉप 3 मध्ये अभिजित सावंत, निक्की तांबोळी आणि सुरज चव्हाण या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत झाली आहे.
बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका रीलस्टारने ‘बिगबॉस मराठीची ट्रॉफी जिंकली आहे. सुरजवर प्रेक्षक
मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोढवे या गावातला सूरज चव्हाण मुलगा आहे. रील बनवून टिकटॉकवर सूरजला प्रसिद्धी मिळाली होती. अत्यंत गरीब परिस्थितीतून वर येत सूरज चव्हाण ने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे. सुरज चव्हाण ने वेळप्रसंगी माथाडी कामगाराचं कामही केलं. त्याच्या साधेपणाने त्याने सगळ्यांची मनं जिंकली. आपल्या वागण्यामुळे, प्रत्येकाचा आदर करण्याच्या सवयीमुळे, टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सूरजला सगळ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. अखेर सगळ्या अडचणींचा सामना करत सूरज आता बिग बॉस मराठी चा विजेता ठरला आहे.