June 30, 2025 4:19 am

इतिहास विषयात पर्यटनातील रोजगाराच्या विविध संधी रुसा व इतिहास विभागाचा संयुक्त उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

इतिहास विषयात पर्यटनातील रोजगाराच्या विविध संधी रुसा व इतिहास विभागाचा संयुक्त उपक्रम

 

अमळनेर : विक्की जाधव

खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) इतिहास विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानच्या वतीने सोमवार रोजी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.प्रस्तुत कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे संचालक मा. प्रदीप भाऊ अग्रवाल यांचे हस्ते झाले. या समारंभाचे अध्यक्ष पद प्राचार्य डॉ.अरुण बी जैन यांनी भूषविले. प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. डॉ धनंजय चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालनाची जवाबदारी प्रा.भाग्यश्री जाधव यांनी पार पाडली. यावेळी अतिथींचा परिचय प्रा.विजय साळुंखे यांनी करून दिले.

पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सोबत अनेक इतर संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, पर्यटन,अभ्यासक,बंधू भगिनी यांनी कार्यशाळेला निःशुल्क नोंदणी केली. आर. सी. पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालय,शिरपूर येथील विद्यार्थी-प्राध्यापक, रुक्मिणी ताई महिला महाविद्यालय,अमळनेर येथील विद्यार्थी-प्राध्यापक, मारवड महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. उदघाटक मा. प्रदीप अग्रवाल यांनी यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनीविद्यार्थ्यांना पर्यटनातून उज्वल भविष्याकडे मार्गक्रमण करण्यासाठी या संधीचे सोने करावे,असे आवाहन केले. प्रथमसत्र मध्ये डॉ.जगताप पी. डी.(संभाजीनगर) यांनी अजिंठा लेणी येथील सर्व माहिती स्लाईडद्वारे दाखवून त्याचा अर्थ व उपयोगिता स्पष्ट केले. तसेच दुसर्‍या सत्रा मध्ये प्रा.धर्माधिकारी पी. टी.(मुंबई) यांनी जागतिक पर्यटन आणि उद्योग या संबंधीचे स्लाईड दाखवून सविस्तरपणे माहिती दिली. तिसर्‍या सत्रात प्रा.डॉ.बिना सेंगर (संभाजीनगर) यांनी पर्यटनातून विविधांगी विकास कसा साधायचा याबाबत स्लाईड वरुन महिती दिली. अंतिम सत्रात एकवीरा आशीर्वाद ट्रॅव्हल,अमळनेर या ठिकाणी जवळपास 40 वर्षापासुन कार्यरत असणारे पर्यटन संस्थेचे संचालक मा.अनिल पाठक यांनी माहितीचे सादरीकरण केले. त्यात त्यांनी पर्यटन संस्थेतून रोजगार कसा उपलब्ध होतो आणि येणार्‍या काळात यातील नवीन टेक्निकस विद्यार्थ्यांना आकर्षित करीत आहे,असे आवर्जून सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी समारोप कार्यक्रमात उप प्राचार्य तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विजय तूंटे यांनी विद्यार्थ्यांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले यावेळी आणि प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वितरित केले.

प्रस्तुत कार्यक्रमास विविध विद्याशाखेचे विभाग प्रमुख, प्राध्यापक बंधू -भगिनी आणि विद्यार्थी- विद्यार्थिनीनी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वर्गाने तसेच इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!