रोटरी क्लब भिगवन च्या वतीने राष्ट्रीय शांतता सप्ताह आयोजित
(निलेश गायकवाड)
रोटरी क्लब भिगवन व भिगवन महाविद्यालय, भैरवनाथ विद्यालय भिगवण,विठ्ठलराव थोरात न्यू इंग्लिश स्कूल भिगवन, कोंडीराम क्षीरसागर विद्यालय भिगवन,आनंदराव पवार न्यू इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शांतता सप्ताह आयोजित करण्यात आला
यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या मनावरील ताण कसा कमी करावा याचे मार्गदर्शन रोटरी क्लब अध्यक्ष संतोष सवाने यांनी केले.आंतरराष्ट्रीय शांतता दिवस 21 सप्टेंबर 2024 शांततेसाठी माझी प्रतिज्ञा माझा विश्वास आहे की मी माझ्या कृती, माझे शब्द आणि माझ्या विचारांद्वारे एक शक्तिशाली शांतता निर्माण करणारा आहे.
माझा विश्वास आहे की आपण दररोज आपल्या सभोवतालच्या जगात समज, आदर आणि शांतता निर्माण करू शकतो.
मला विश्वास आहे की चांगल्या ऐकण्याद्वारे आपल्याला अधिक चांगली समज मिळेल.मी हिंसा नाकारतो आणि माझे घर, शाळा आणि समुदायामध्ये शांततापूर्ण संवाद आणि उपाय योजना तयार करण्यासाठी काम करतो.मी गुंडगिरी, भेदभाव आणि सांस्कृतिक असंवेदनशीलता नाकारतो आणि कुणालाही असा त्रास होत असल्यास त्याच्या समर्थनार्थ उभा आहे.मी समजतो की अहिंसा हे एक सकारात्मक, सक अशा पद्धतीची शपथ या विद्यालयांमधून घेण्यात आले.या वेळी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत वरोटरीचे तर पदाधिकारी उपस्थित होते.