June 29, 2025 12:01 am

बारामती breaking : विद्यार्थाचा कोयत्याने महाविद्यालय परिसरात खून, एकाला पोलिसांकडून ताब्यात.

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामती breaking : विद्यार्थाचा कोयत्याने महाविद्यालय परिसरात खून, एकाला पोलिसांकडून ताब्यात.

बारामती(प्रतिनिधी : वर्षा चव्हाण)

बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्याच्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने कोयत्याने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी बारामतीत घडला.या प्रकारामुळे बारामती शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दोघांमध्ये पार्किंगला गाडी लावण्यावरून काही दिवसांआधी भांडण झाल्याची माहिती समजत आहे. या रागातूनच हा खून झाल्याची माहिती समजत आहे.
अथर्व पोळ (वय 18) असे खून झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सोमवारी (दि. 30) रोजी सकाळी ही घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार तिघांनी अथर्व याच्यावर वार केले. एकाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघे फरार झाले आहेत. 15 दिवसापूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी एकमेकांना बघून घेण्याची धमकी देण्यात आली होती. त्याचे पर्यावसन थेट खुनात झाल्याचे समोर येत आहे.खून झालेल्या विद्यार्थ्याला तत्काळ सिल्वर जुबली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

दरम्यान,बारामतीमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आता मोठ्या प्रमणाता वाढ होताना दिसत आहे. पुणे शहारानंतर आता ग्रामीण भागातही कोयत्याचं लोन महाराष्ट्रभर पसरताना दिसत आहे. विद्यार्थ्याने महाविद्यालयामध्येच हत्या केल्याने बारामती सारख्या शांतता प्रिय शहरात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!