June 29, 2025 5:27 am

प्रताप’ च्या इतिहास विभागाचे विधान भवन,मुंबई येथे अभ्यास दौरा संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप’ च्या इतिहास विभागाचे विधान भवन,मुंबई येथे अभ्यास दौरा संपन्न..

 

अमळनेर : विक्की जाधव 

खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) इतिहास विभागातील संशोधक विद्यार्थ्यांनी नुकतीच मुंबई विधान भवन येथे भेट दिली.ही शैक्षणिक सहल इतिहास विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

विधान भवन सचिवालयातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी संशोधक विद्यार्थ्यांंना विधान भवनाची पूर्ण माहिती दिली.

यावेळी सभागृहात विधान सभा, विधान परिषद प्रत्यक्ष पाहणी करून सभागृहात बसण्याची अनुभुती संशोधकांना प्राप्त करून दिली तसेच शासकीय कामकाज बाबत, विधिमंडळ अधिवेशन काळातील कामकाज, विविध प्रस्ताव पारीत होण्यासाठी कामकाज स्वरुप याची सविस्तर माहिती अधिकारी वर्गाने दिली. या प्रसंगी संशोधकांनी अनेक प्रश्न विचारले, त्याबाबत विस्तृत माहिती देण्यात आले. यावेळी इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ धनंजय चौधरी, भाग्यश्री जाधव, प्रा.प्रसाद मुठे समवेत 28 संशोधक विद्यार्थी असे एकूण 31 व्यक्तीनी भेटीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!