इंजि. सपनाताई राजेंद्र मेश्राम यांची विद्यार्थ्यांविषयी आपुलकी भावनेतून एक वही एक पेन संकल्प अभियान

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंजि. सपनाताई राजेंद्र मेश्राम यांची विद्यार्थ्यांविषयी आपुलकी भावनेतून एक वही एक पेन संकल्प अभियान

रजत डेकाटे प्रतिनिधी

भिवापूर तालुक्यातील धामणगाव गवळी, खोलदोडा, लोणारा, वणी, नांद या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्त्या इंजि.सपनाताई मेश्राम व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उर्फ राजुभाऊ मेश्राम यांच्या हस्ते नोटबुक व पेनाचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन नांद येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर घरत यांच्या नेतृत्वाखाली या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राजु मेश्राम आणि सपत्नीक विद्यार्थ्यांना हितगुज साधला.

यावेळी धामणगाव (गवळी) येथील मुख्याध्यापक सतीश चव्हाण, शिक्षक अनिल डांगे, संदीप उमाठे, खोलदोडा येथील मुख्याध्यापक मदन माटे, लोणारा येथील मुख्याध्यापक के.एस. भुरे, शिक्षक श्रीधर वाकुडकर, वणी येथील मुख्याध्यापक गंगाधर घोडमारे, शिक्षक सुनील राठोड, शिक्षक देवतारे, नांद येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक -१ शिक्षक इंगळे, नन्नावरे, शिक्षिका कु. कुंदा घोडमारे, नांद जिल्हा परिषद शाळा क्रमांक -२ मुख्याध्यापिका सौ रेवतकर, शिक्षिका कविता चव्हाण, शिक्षिका सविता भगत, यावेळी गावातील नागरिक संपत श्रीरामे प्रकाश सावसाकडे जितेंद्र चौधरी आदींची उपस्थिती होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!