सुरंगली येथे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा बैल पोळा अंत्यंत उत्साहात आणि आनंदात शांततेत साजरा
भोकरदन संजीव पाटील
भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा बैल पोळा अंत्यंत उत्साहात आणि आनंदात शांततेत साजरा करण्यात आला.सुरंगली येथे दोन बैल पोळ्याची पंरपरा आहे. विशेष म्हणजे कुठलाही पोलिस बंदोबस्त विना बैल पोळा शांततेत साजरा केला करण्यात आला. बैलाची पुजा करुन पुरण पोळी खाऊ घालण्यात आली . पोळा पाहण्यासाठी आबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती.काशीविश्वेश्वर मंदिरावर महादेवाच्या दर्शना साठी बैलांना आणण्यात आले होते.काशीविश्वेर मंदीराच्या प्रांगणात.आणी गावातील मोठ्या वेशीत बैल पोळा भरवण्यात आला. पोलीस पाटील संजय दांडगे यांची उपस्थिती होती.