न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

भारताच्या रेल्वे मंत्रालयात पहिल्यांदाच एखाद्या दलित अधिकाऱ्याची सर्वोच्च पदावर नियुक्ती..

अपनी भाषा में पढ़े! Translate

भारताच्या रेल्वे मंत्रालयात पहिल्यांदाच एखाद्या दलित अधिकाऱ्याची सर्वोच्च पदावर नियुक्ती झाली आहे. रेल्वे मंत्रालयात ‘चेअरमन अँड सीईओ’चं पद सर्वात मोठं असतं.

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव. 

हे पद भारत सरकारमधील सचिव पदाच्या समकक्ष असतं. म्हणजेच भारत सरकारच्या इतर मंत्रालयातील सचिवांइतकंच रेल्वे बोर्डाचं चेअरमनपद देखील महत्त्वाचं असतं.

 

भारतीय रेल्वेतील मेकॅनिकल इंजिनीअर्स सेवेचे अधिकारी सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाच्या नव्या चेअरमन आणि सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते आजपासून (1 सप्टेंबर 2024) पदभार स्वीकारणार आहेत.

एखादा दलित अधिकारी पहिल्यांदाच इतक्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त झाल्यानंतर त्या गोष्टीची सोशल मीडियावर जोरात चर्चा होते आहे.

सतीश कुमार 1986 बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग (IRSME) चे अधिकारी आहेत.

याआधी त्यांनी रेल्वेत डीआरएम आणि रेल्वेच्या एनसीआर झोनमध्ये जीएम पदाची जबाबदारी सांभाळली आहे. संतीश कुमार यावर्षी 5 जानेवारीला रेल्वे बोर्डात ‘मेंबर ट्रॅक्शन अँड रोलिंग स्टॉक’ बनले होते.

सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डात चेअरमनपदावर नियुक्ती झाल्यापासून काही काँग्रेस समर्थक या निर्णयामागे राहुल गांधी यांचा दबाव देखील कारणीभूत असल्याचं म्हणत आहेत.

काँग्रेस नेते उदित राज यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दावा केला की, “हा निर्णय पूर्णपणे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या दबावामुळेच झाला आहे. नाहीतर सर्व प्रकारे पात्र असून देखील सतीश कुमार यांची या पदावर नियुक्ती झाली नसती. आधी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मर्जीतील लोकांचीच सर्वोच्च पदांवर नियुक्ती होत असे.”

त्यांचं म्हणणं आहे की, काँग्रेसच्या दबावामुळेच अलीकडे लॅटरल एन्ट्रीद्वारे नियुक्तीची जाहिरात देखील मागे घेण्यात आली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!