June 29, 2025 9:30 am

दौंड शिवसेना शहर कार्यालयासमोरील दहीहंडी स्वरनाद वाचा प्रशिक्षण केंद्र मधील कर्णबधिर मुलांनी फोडली.

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड शिवसेना शहर कार्यालयासमोरील दहीहंडी स्वरनाद वाचा प्रशिक्षण केंद्र मधील कर्णबधिर मुलांनी फोडली.
[दौंडकरांनी जात पात धर्म पक्ष बाजूला ठेऊन दौंड च्या विकासासाठी एकत्र यावे.]
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड शहर – शिवसेना दौंड शहर दहीहंडी कर्णबधिर मुलांकडून फोडण्यात आली यावर्षी दौंड शहर शिवसेनेच्या वतीने शालीमार चौक येथील कार्यालयासमोर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या व दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यालयासमोर श्रीकृष्ण जन्माष्टमी साठी भव्य सजावट करण्यात आली होती. महिलांनी श्रीकृष्णाचा पाळणा म्हणून श्रीकृष्ण जन्माचा आनंद प्रसाद लुटला. यावेळेस दौंड शहरांमध्ये चालू असलेली जन्मताच कर्णबधिर असलेली मुलांची शाळा स्वरनाद वाचा प्रशिक्षण केंद्र मधील मुलांनी दहीहंडी फोडण्यासाठी सहभाग घेतला. या दहीहंडीचे आयोजन श्रीनाथ ननवरे शिवसेना दौंड शहरप्रमुख यांनी केले होते लहान मुलांनी नृत्य करून दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला ज्या मुलांना ऐकताही येत नाही अशा मुलांनी गाण्याचा तलाचा डोळ्याने आनंद घेऊन नृत्य केले. यावेळी श्रीनाथ ननवरे म्हणाले ज्याप्रमाणे ही दहीहंडी फोडण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन फोडावी लागते, त्याचप्रमाणे दौंडच्या विकासासाठी आपण सर्व दौंडकरांनी एकत जात पात धर्म पक्ष बाजूला ठेऊन दौंड चा कायापालट करावा, त्यासाठी एकत्र येऊन काम करावे.
या कार्यक्रमासाठी सौ. अर्चना साने, सौ शितल जोगवाडे, रघुवीर अंतरकर, अमर चांडले, किरण वांभिरे, श्रीकांत गुजर, परीक्षित पुरंदरे, सयली कांबळे, सिमरन पगी, परिसरातील दुकानदार परिसरातील नागरिक असंख्य संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!