अमळनेर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील महाजन यांची अशीही कर्तव्य तत्परतां..
अमळनेर : विक्की जाधव..
अमळनेर शहरात संत श्री सखाराम महाराज विठ्ठल रुक्माई संस्थान अमळनेर चा यात्रा उत्सव सुरू आहे. याचे उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भावी भक्तांची गर्दी या ठिकाणी जमत असते
मोठमोठे पाळणे, खाऊ, दुकान, खेळणी, इत्यादीची जणु मेजवानीच असते,
या ठिकाणी मोठी गर्दी झाल्यानी असेच आपल्या आई पासून ऐका ६ वर्षीय बालकांचा आपल्या आई पासून गर्दीत हात सुटला अन बाळ हरवले हरवले अशी एकाच चर्चा यात्रे परिसरात होऊ लागली याठीकाणी कर्तव्यावर असणारे पोलीस बांधव श्री. सुनील महाजन यांना हे बाळ दिसून आले त्यांनी अर्धा तास त्याच्या आई-वडिलांचा शोध घेऊन अखेर एका आईला आपले बाळ मिळाले यावेळी त्यांनी पोलीस सुनील महाजन ६०२ आणि अशोक कुमावत २४५७ यांचे आभार मानले.