सम्राट नगर येथील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त …….
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – दौंड शहरातील दौंड – सिद्धटेक मार्गालगत असणारे सम्राट नगर (भिमनगर) चा एक भाग याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत असून व्यवस्था अपुरी पडते की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
गेल्या 3-4 महिन्यापासून सम्राट नगर येथील सांड पाण्याचे ड्रेनेज फुटून बाहेर रस्त्यावरती व इतर नागरिकांच्या घरामध्ये त्यातील मैला मिश्रीत पाणी बाहेर रिटर्न येत असून प्रभागातील नागरिकांनी अनेक वेळा वारंवार नगरपालिकेला तोंडी सूचना देऊन दौंड नगरपालिकेचे कामगार पाठवते परंतु कामगार अर्धवट काम करून सोडून जातात असा नागरिकांचा आरोप आहे आहे, त्याचा दुष्परिणाम असा की त्या सांड पाण्यामध्ये डास व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले . त्यातून डेंग्यू,मलेरिया अश्या रोगांशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी दौंड नगरपालिका जबाबदार राहील … अशी सम्राट नगर ( भीमनगर )
मधील रहिवाशी यांनी संतप्त प्रतिक्रिया आहे.
सध्या नगरपालिकेला गेली 2 वर्षापासून नगरसेवक नसून प्रशासकाच्या हातात कारभार आहे त्यामुळे अनेक कामे रेंगाळलेली दिसून येत आहे यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ झालेली दिसत आहे.
सम्राट नगर येथील नागरिकांनी दौंड नगर पालिकेला निवेदन दिले असून आपल्या संतप्त प्रतिक्रिया त्यामध्ये नोंदवलेल्या आहेत यामध्ये मुख्यत्वे सर्व चंबर दुरुस्त करणे, सिमेंट काँक्रिट रोड बनवणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे व रोड लाईट बसवणे अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.