June 29, 2025 12:37 pm

अमळनेर पोलीस स्टेशनला अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांची सदिच्छा भेट

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर पोलीस स्टेशनला अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांची सदिच्छा भेट

अमळनेर: विक्की जाधव.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांच्या सदस्यांनी अमळनेरचे पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री विकास देवरे साहेब यांची भेट घेउन समाजातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली त्यातील एक ज्वलंत समस्या म्हणजे अल्पवयीन मुलींचे घरातून पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही एक समाजाला लागलेली कीड आहे याबद्दल साहेबांनी खेद व्यक्त केला आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांमध्ये जाणीव जागृती पर कार्यशाळांचे आयोजन करावे असेही त्यांनी सुचविले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर ग्राहक बाबत करीत असलेल्या जनजागृती व सेवेबद्दल साहेबांनी समाधान व्यक्त केले . त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागास सदिच्छा भेट देण्यात आली तेथील कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणारे रस्ते व रस्त्यावरील स्पीड ब्रेकर विषयी अनेक शकांचे निरसन केले. त्यावेळी प्रांत महिला आयाम प्रमुख. ऍडव्होकेट सौ भारती अग्रवाल ,अ .भा. ग्रा. पं. नूतन अध्यक्षा सौ स्मिता चंद्रात्रे ,तालुका संघटक सौ. ज्योती भावसार, जिल्हा सायबर व बँकिंग प्रमुख श्री विजय शुक्ल,

जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख श्री सुनील वाघ उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!