विमा काढायला दिलेले पैसे
परत करण्यासाठी दिलेला धनादेश न
वटल्याने एकाला न्यायालयाने सहा महिन्यांची साधी कैद आणि दीड लाखाचा दंडाची शिक्षा सुनावली
आहे.
अमळनेर : विक्की जाधव.
राजूसिंग बाबूसिंग परदेशी यांनी. २०१४ मध्ये मोहन महादेव वाडकर याला विमा काढण्यासाठी ९० हजार रुपये दिले होते. मात्र, विमा काढत नसल्याने परदेशी यांनी पैसे परत
मागितले. त्यावेळी वाडकर याने धनादेश दिला होता. हा धनादेश न वटल्याने परदेशी यांनी न्यायालयात १३८ प्रमाणे
खटला दाखल केला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या. नीलेश यलमाने यांच्या न्यायालयात हा खटला सुरू
होता.
परदेशी यांच्यातर्फे एस. आर. पाटील यांनी बाजू मांडली. आरोपी मोहन वाडकर याला सहा महिन्यांची साधी
कैद, तसेच रकमेचे ९० हजार व दंड ६१
हजार २०० असे एकूण १ लाख ५ हजार रुपये एका महिन्याच्या आत परदेशी यांना द्यावेत. मुदतीच्या आत
दंडाची रक्कम न दिल्यास दोन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.