June 30, 2025 2:09 pm

अजितदादांची संवेदनशीलता…

अपनी भाषा में पढ़े! Translate

अजितदादांची संवेदनशीलता…
@ – उदय कुलकर्णी, बारामती…

आ.अजितदादांची प्रतिमा कठोर, फटकळ अशी तयार केली गेली आहे.परंतु त्यांच्याकडे अडचणी घेउन जाणार्‍या सर्वसामान्य नागरिकांचा अनुभव मात्र अतिशय वेगळा आहे.दादा समोरच्याची अडचण ऐकुन घेतात , त्याच्या सांगण्यातला खरेपणा जोखतात आणि तत्काळ शक्य ती उपाययोजना करत प्रश्नाची तड लावतात असा आश्वासक अनुभव असंख्यांना येत असतो.
असाच एका भगिनीला आलेला अनुभव.भोसरी मध्ये एका दांपत्याचा छोटासा इंजिनिअरिंग व्यवसाय होता.बारामती एम.आय.डी.सी. मध्ये प्लाॅट घेउन, बॅंकेकडून कर्ज घेउन त्यांनी इथे हा व्यवसाय विस्तारला.ह्या भगिनी पतीला व्यवसायात सहाय करत.दुर्दैवाने काही व्यावसायिक अडचणी आल्या, पतीचे आजारपण सुरु झाले आणि व्यवसाय तोट्यात जात आजारी पडला.बॅंकेचे तगादे सुरु झाले.जामीनदार नाराज झाले.बॅंकेतर्फे कोर्टात केस दाखल केली गेली.एका माहितगार नातेवाईकांच्या मदतीने ह्या बॅंकेविरुध्द कोर्टात आपले म्हणणे सादर करु लागल्या.भोसरीत सुरु असलेला व्यवसाय कसाबसा सुरु होता.मुलांचे शिक्षण,पतीचे आजारपणाचा खर्च आणि बॅंकेशी लढा याने या भगिनी मेटाकुटीला आल्या होत्या.बॅंकेच्या सहमतीने मार्ग निघण्यासारखा होता.बॅंकेशी पूर्वी चांगले संबंध होते परंतु कोर्टात केस गेल्यावर अधिकारी कसलेही सहकार्य करत नव्हते.उलट आडकाठी आणत होते.ह्या भगिनी एकहाती लढाई लढत होत्या.अशातच एकदा माझे पार्टनर संजय वाघ यांची बस प्रवासात त्या भगिनीशी भेट झाली.कामामुळे थोडाफार परिचय होता.संजयने त्यांना अजितदादांची भेट घेउन त्यांच्यापुढे अडचण मांडण्यास सुचवले.त्या ताई म्हणाल्या अहो दादांचा स्वभाव फार कडक आहे .त्यांच्याशी ओळखदेखील नाही.त्यांच्याकडे जायचे कसे? संजयने धीर देत त्यांना सांगितले की- “दादांकडे जायचे तर ओळखीची, वशिल्याची गरज नाही.दादा पिंपरी चिंचवड महापालिकेत नागरिकांना भेटतात.तुम्हाला तिथल्या तिथे भेटता येईल.तुम्ही निःसंकोचपणे सगळ्या कागदपत्रांसह भेट घेउन त्यांच्यापुढे तुमची अडचण सांगा.मार्ग निघेल.आणि तुम्ही इतके प्रयत्न करताहात हा एक प्रयत्न करुन पहायला काय हरकत आहे ?”
त्या ताईंना या बोलण्याने धीर आला.बिकट परिस्थितीमुळे गांगरलेल्या ताईंनी आपला धीर एकवटत काहीशा दडपणाखाली दादांची भेट घेतली.त्यांचे म्हणणे दादांनी शांतपणे ऐकले.त्यांच्या अडचणींचा पाढा ऐकुन दादा क्षणभर स्तब्ध झाले.”तुमची अडचण मी समजू शकतो पण यातुन मार्ग कसा काढायचा ,तुमच्याकडे काही पर्याय आहे का?” दादांनी विचारले.त्यावर ताईंनी सांगितले की बारामतीतील सदर प्लाॅटसाठी त्यांच्याकडे दोघातिघांकडून मागणी आली आहे.परंतु बॅंक आडकाठी आणते आहे.बॅंकेने मान्यता दिल्यास व्यवहार होउ शकतो ,त्यातुन बॅंकेचे कर्ज भागले तरी मला पुरेसे आहे.एकदा हा ससेमिरा थांबला म्हणजे मी इथल्या व्यवसायाकडे लक्ष देउन तो व्यवस्थित संभाळु शकेन.
दादांनी पी.ए.ना सांगुन तत्काळ बॅंकेच्या वरिष्टतम अधिकार्‍यांशी चर्चा केली आणि ह्या भगिनीची सदर केस ही जेन्युईन आहे.त्यांच्या अडचणी योग्य आहेत.व त्यांना यातुन बाहेर काढणे बॅंकेचे कर्तव्य आहे.तुमचे अधिकारी विनाकरण अडथळा आणत आहेत.त्यांना योग्य सूचना द्या आणि लवकरात लवकर ह्या भगिनीचा प्रश्न मिटवा आणि काय कार्यवाही केली ते मलाही कळवा अशा स्पष्ट शब्दांत सूचना केल्या.
दादांच्या या फोननंतर सूत्रे हलली आणि बॅंकेनेच पुढाकार घेतल्यावर व्यवहार जुळुन आला आणि ताईंना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र महिना दोन महिन्यात मिळाले.
दादा अशी हजारो सर्वसामान्य लोकांची कामे मार्गी लावत असतात.कसलाही परिचय नसताना,वशिल्याखेरीज योग्य ती खात्री करुन घेत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची दादांची खासियत आहे.
ज्यांनी अनुभवली आहे त्यांना या संवेदनशील व्यक्तिमत्वाविषयी कायम कृतज्ञता वाटत राहिल यात शंका नाही….
@ – उदय कुलकर्णी, बारामती…
.
( मार्मिक समाचार न्यूज – संदिप आढाव – 9697009199)

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!