न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष यांचा राजीनामा

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी :- करमाळा तालुक्यातील चळवळीतील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे करमाळा तालुकाध्यक्ष चंद्रकांत राखुंडे यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला असल्याने ऐन लोकसभेच्या रामधुमाळीत भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
याबाबत राखुंडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मी २००८ ते २०२४ पर्यंत भाजपा चे मनापासून काम केले आहे. मागील लोकसभेत सुद्धा निंबाळकर यांचे मनापासून काम करत त्यांच्या विजयात खारीचा वाटा उचलला होता. परंतु निंबाळकर यांनी पाच वर्षात आम्हाला कधीही विश्वासात घेतले नाही. मोजक्याच लोकांना संपर्क साधून त्यांचीच कामे आज पर्यंत त्यांनी केलेली असल्याने निष्ठावंत भाजपाचे पदाधिकारी यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करीत असल्याचा घणाघात ही यावेळी राखुंडे यांनी केला. तसेच मोजक्या लोकांना सोबत घेऊन निंबाळकर यांनी खासदार होण्याचे स्वप्न पाहत राहावे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. अजून कोणकोणते पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत हे मात्र अद्याप गुलदस्त्यात असले तरी भाजपच्या वरिष्ठांनी या बाबीकडे गांभीर्य पूर्वक पाहता राजीनामा सत्र थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!