June 29, 2025 2:38 pm

दगडवाडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपच्या सुशीला रासकर

अपनी भाषा में पढ़े! Translate

दगडवाडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपच्या सुशीला रासकर
-हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार
इंदापूर : प्रतिनिधी. भगवान् लोंढे. दि.10/4/24
दगडवाडी (ता. इंदापूर) ग्रा.पं.च्या सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या सुशीला दत्तात्रय रासकर यांची सोमवारी दि.8 बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नूतन सरपंच सुशीला रासकर यांचा इंदापूर येथे बुधवारी (दि.10) सत्कार करण्यात आला.
यासत्कार प्रसंगी माजी सरपंच रामदास (नाना) रासकर, उपसरपंच दत्तात्रय पोळ, राजू सूळ, मनोज निंबाळकर, आप्पा पारेकर, सचिन रासकर (चेअरमन), हनुमंत रासकर, तानाजी रासकर, संदीप गायकवाड, रमेश दुधाळ, स्वाती पारेकर, किसन मोटे, लक्ष्मीबाई कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते. दगडवाडी ग्रामपंचायत भाजपचा बालेकिल्ला आहे. गावच्या विकासासाठी आगामी काळात निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही याप्रसंगी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!