June 29, 2025 11:08 am

बोराडी ग्राम परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद मराठी व शाळा,आशा वर्कर यांच्या विद्यमाने …

अपनी भाषा में पढ़े! Translate

बोराडी ग्राम परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद मराठी व शाळा,आशा वर्कर यांच्या विद्यमाने …

मतदानाचा हक्क बजवावा म्हणून नागरिक व महिलांमध्ये जनजागृती….

बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) बोराडी ग्राम परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद मराठी व शाळा,आशा वर्कर यांच्या विद्यमाने बोराडी गावांसह परिसरातून लोकसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा म्हणून नागरिक व महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
धुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बोराडी ग्राम परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद मराठी व शाळा,आशा वर्कर, बचत गटाच्यां महिला, मावली भजनी मंडळ,
यांच्या संयुक्त विद्यमाने बोराडी गावांसह परिसरातून लोकसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा म्हणून पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गावातून रॅली रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा विविध घोषवाक्य स्पर्धा पथनाट्य मानवी साखळी मतदान जनजागृतीसाठी तयार करणे, उपस्थित नागरिकांच्या प्रतिज्ञा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बोराडी ग्राम परिषदेचे ग्रामविकास अधिकारी डी.आर.पेढाकर यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या प्रसंगी ज्ञानेश्वर पवार,भटू पवार, निंबा पाटील,रामा गुजर, रवींद्र पाटील,कालू पावरा, सुनिल गोपाळ,संजय पाटील, विलास गोपाळ, पिंटू ठाकूर, रवींद्र भील,अंगणवाडी सेविका सुधाबाई सोनार, जयश्री देवरे, सुनिता सगरे, प्रतिभा के.पाटील, प्रतिभा ऐ पाटील, मदतीस बेबी पावरा, जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक तापीराम पावरा, श्रीमती जागृती निकम,वर्षा बोरसे, इंदिरा महाले, जितेंद्र जोशी, ज्ञानेश्वर निकुंभे, कविता बडगुजर, गोरक्षनाथ पानसरे, ममता बोरा, आशा वर्कर सरिता पाटील, ममता पाटील, सुषमा वाल्हे,सिमा पाटील, अर्चना सत्तेसा, यांच्या सह गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा म्हणून पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गावातून विविध घोषणा देत रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात जिल्हा परिषद मराठी शाळेतून करण्यात आली राम नगर, देव मोगरा माता कॉलनी, डॉ. सुभाषचंद्र बोस नगर, कर्मवीर नगर, संत गाडगेबाबा नगर, जुनी बाजार गल्ली पाटीलवाडा एकलव्य नगर आदी भागातून रॅली काढून परिसर दणाणून काढला या रॅलीत सेल्फी पॉईंट देखील ठेवण्यात आला होता. विविध चौकात सेल्फी काढण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी व महिलांनी एकच गर्दी केली होती यामुळे मतदानाचे महत्त्व त्या ठिकाणी पथनाट्याच्या द्वारे पटवन देण्यात आले होते. तसेच निबंध स्पर्धा वक्र स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षिसाचे वाटप देखील करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीसाठी बोराडी ग्राम परिषद, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद मराठी शाळा व आशा वर्कर यांनी श्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!