मारवड येथील कै. नान्हाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260830-WA0267

मारवड येथील कै. नान्हाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

 

अमळनेर : विक्की जाधव.

: कै. नान्हाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथे महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. वसंतरावजी देसले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे प्रा. डॉ. देवदत्त पाटील यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर तसेच भारतीय क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी नियमितपणे खेळामध्ये सहभाग घेऊन शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करावेत, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. वसंतरावजी देसले यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षणासोबतच खेळालाही जीवनात महत्त्वाचे स्थान असून, खेळामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे त्यांनी सांगितले

या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-खेळाडू, प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!