मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात मोठी चोरीपाच दिवसांत दुसऱ्यांदा चोरीची घटना; मंदिराचे लॉक तोडून दागिने व रोकड लंपास

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260829-WA0977

मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात मोठी चोरीपाच दिवसांत दुसऱ्यांदा चोरीची घटना; मंदिराचे लॉक तोडून दागिने व रोकड लंपास

अमळनेर : विक्की जाधाव.

मातोश्री नगर परिसरातील श्री चामुंडा माता मंदिरात काल रात्री चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या पाच दिवसांत मातोश्री नगर परिसरात दुसऱ्यांदा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री अज्ञात चोरट्यांनी चामुंडा माता मंदिराच्या दरवाजाचे लॉक तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील कपाटे फोडून त्यातील ऐवजाची चोरी करण्यात आली. मातेवरील सोन्याच्या टिकल्या, बांगड्या तसेच दानपेटीतील रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे.

चोरट्यांनी मंदिरातील कपाटे व इतर साहित्याचीही नासधूस केली आहे. सकाळी मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

या घटनेमुळे मातोश्री नगर परिसरात खळबळ उडाली असून, सलग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर करावी

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!