श्री मंगळग्रह मंदिरात आजपासून रंगणार अमळनेरच्या लेकींचा कौतुक सोहळा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260815-WA0236

श्री मंगळग्रह मंदिरात आजपासून रंगणार अमळनेरच्या लेकींचा कौतुक सोहळा.

 

अमळनेर : विक्की जाधव.

माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, सासर-माहेर दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने आणि मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेरच्या लेकींचा आगळावेगळा कौतुक सोहळा ‌‘माहेरचा पारिजात‌’ या उपक्रमातून आयोजित करण्यात आला आहे. अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या वतीने हा विशेष स्नेहमेळा शनिवार, दि. 29 ऑगस्ट ते सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026 दरम्यान येथील श्री मंगळग्रह मंदिरात रंगणार आहे. त्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकारी लाभले आहे.

file_00000000b6e8820b96672ba54fd0f805

पारिजातकाच्या फुलांचा सडा जसा अवघे अंगण सुगंधित करतो त्याचप्रमाणे माहेरची लेकी आपल्या अस्तित्वातून, कर्तृत्वातून आणि मायेतून सासर-माहेर दोन्ही घरे उजळून टाकतात. याच भावनेतून ‌‘माहेरचा पारिजात‌’ या उपक्रमाची संकल्पना साकारण्यात आली आहे. माहेरच्या अंगणात पुनश्च बालपण अनुभवता यावे, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि मैत्रिणींसोबत मनमोकळेपणाने गप्पांची मैफल रंगावी, हा या स्नेहमेळ्यामागील प्रमुख उद्देश आहे.

या स्नेहमेळ्यात भाषण, कविता, गाणी, नृत्य, विनोद, पारंपरिक खेळ, उखाणे, मंगळागौरीचे खेळ यांसह विविध मनोरंजक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील हिरवाईने नटलेल्या प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात हा सोहळा आनंद, उत्साह आणि भावनिक आठवणींनी रंगणार आहे.

या उपक्रमासाठीची नोफ्लदणी आता पूर्णत्वास आली आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्षा सौ. कांचनताई शहा, उपाध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील व सौ. सरोजताई भांडारकर, सचिव सौ. वसुंधराताई लांडगे, खजिनदार प्रा. सौ. शीलाताई पाटील यांच्यासह महिला मंचच्या कार्यकारी मंडळातील सदस्या आणि मंगळग्रह सेवा संस्थेचे सर्व विश्वस्त व सेवेकरी परिश्रम घेत आहेत. ‌‘माहेरच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि माहेरच्या लेकींंचा सन्मान अनुभवण्यासाठी सर्व माहेरवाशिणींनी आवर्जून वेळेत उपस्थिती द्यावी, असे आवाहन अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

 

स्नेहमेळ्यात आज (शनिवार, दि. 29 ऑगस्ट) होणारे कार्यक्रम

सकाळी 9.00 वाजता माहेरवाशिणींचे स्वागत, हळद-कुंकू लावून औक्षण, गजरे वाटप, ढोल-ताशांच्या गजरात श्री मंगळग्रह देवांची सामूहिक आरती. 9.30 वाजता अल्पोपहार, सर्व माहेरवाशिणींनी हाता-पायाला मेंदी लावणे तसेच हातात बांगड्या भरणे. याचवेळी प्रत्येकीनेे स्वयंपरिचय देणे. दुपारी 12.15 वाजता सामूहिक अभिषेक. 1.10 वाजता सामूहिक भोजन. 2.00 ते 3.00 या वेळेत विविध बैठे खेळ. सायंकाळी 5.30 वाजता सामूहिक चहापान. 5.55 वाजता श्री मंगळग्रह देवांची सामूहिक आरती. 7.30 वाजता दीपप्रज्वलन, माहेरवाशिणींचा सन्मान, मंगळागौर आदी. रात्री 9.30 वाजता रात्रीचे भोजन तसेच विविध खेळ खेळणे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!