ग्रामीण भागातून कलाकार घडावेत – प्रमोद जाधव

अपनी भाषा में पढ़े! Translate

ग्रामीण भागातून कलाकार घडावेत – प्रमोद जाधव

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

ग्रामीण भागातील तरुण-तरुणींमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन दिल्यास निश्चितच उत्कृष्ट कलाकार घडू शकतात, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद मानसिंगराव जाधव यांनी केले.

संम्मेक मोशन पिक्चर्स संचलित प्रशिक फिल्म अकॅडमीच्या अॅक्टिंग क्लासचे उद्घाटन बारामती क्लब येथे प्रमोद जाधव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील कलाकारांना संधी आणि योग्य दिशा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगताना त्यांनी नमूद केले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील बॅरिस्टर नाथ पै एकांकिका स्पर्धेत त्यांनी साकारलेल्या एकांकिकेला राज्यस्तरावर तृतीय व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला होता. मात्र त्या काळात अशा प्रकारचे अॅक्टिंग क्लासेस आणि मार्गदर्शन उपलब्ध असते, तर आपणही मोठे कलाकार घडू शकलो असतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

माळशिरस तालुका पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी किरण मोरे यांनी प्रशिक फिल्म अकॅडमीचे प्रमुख सचिन रणपिसे यांचे कौतुक करत ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना दर्जेदार प्रशिक्षण देण्याचे आवाहन केले.

यावेळी अकॅडमीचे प्रमुख सचिन रणपिसे यांनी अॅक्टिंग क्लासमध्ये संभाषण कौशल्य, भाषणकला, कल्पनाशक्ती विकास, वाचा शुद्धी यांसह चित्रपट, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म आणि रिमिक्स सॉंग अल्बम याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती दिली. जास्तीत जास्त तरुणांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमास फलटण तालुक्याचे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन अध्यक्ष विजय काकडे, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक सिकंदर खान (मुंबई), नाट्यदिग्दर्शक व लेखक रवींद्र गडकर, साहित्यिक मिलिंद कांबळे, ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य दिलावर तांबोळी (इंदापूर), दिव्यांग सेलच्या प्रदेशाध्यक्ष नीताताई ढवाण पाटील, ॲड. समृद्धी ढवाण पाटील, नानासाहेब साळवे, जयवंत सपकाळ, अविनाश घाटे यांसह नवोदित कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सचिन रणपिसे यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!